शिरोलीत तिथीनुसार शिवजयंती उत्साहात साजरी

राजगुरूनगर – शिरोली (ता.खेड) गेल्या अनेक वर्षापासुन एक गाव एक शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येतो.गेली दोन वर्षे कोरोनामुळे शिवजयंती उत्सव छोट्या स्वरुपात साजरा केला .

यंदा कोरोना कमी झाला आणि शासनाने निर्बध हटवले. त्यामुळे शिवभक्तांनी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली.किल्ले शिवनेरी गडावरुन सकाळी शिवज्योतीचे आगमन झाले .

दिवसभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सकाळी मोरया ब्लड बँक यांच्या सहकार्याने रक्तदान शिबीर , केअरवेल हॉस्पिटल चाकण यांच्या सहकार्याने आरोग्य शिबीर आयोजित केले होते.

सायंकाळी ढोल ताशा, आकर्षक विद्युत रोषणाई सह भव्य दिव्य रथातुन छत्रपतींच्या मुर्तीची मिरवुक काढण्यात आली.

यावेळी गावातील महीला , पुरुष लहान मुले पारपांरीक वेशभुषा परीधान करुण मिरवणुकीत सहभाग घेतला होता.
छोट्या मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचे काव्य सादर करुण शेवटि शिववंदना घेऊन कार्यक्रम संपन्न झाला.

Previous articleशैक्षणिक संस्थांमध्ये सुरक्षाविषयक माहिती फलक लावावेत – डॉ. नीलम गोऱ्हे
Next articleमहाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांची ऊर्जामंत्र्यासोबत सकारात्मक चर्चा