शेतकऱ्यांसाठी ” कृषि निर्यात ” या विषयावर विनामुल्य प्रशिक्षण कार्यक्रम

उरुळी कांचन

“विकेल ते पिकेल” संकल्पने अंतर्गत महाराष्ट्र शासन कृषि विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा पुणे व मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अग्रीकल्चर, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अग्रीकल्चर, पुणे येथे हवेली तालुक्यातील १३७ युवक शेतकऱ्यांसाठी ” कृषि निर्यात ” या विषयावर विनामुल्य प्रशिक्षण कार्यक्रम आयोजीत करण्यात आले होते.

या मध्ये प्रामुख्याने शेतमालाची निर्यात करू इच्छिणारे शेतकरी, तसेच शेतकरी उत्पादक कंपनी व आत्मा अंतर्गत शेतकरी गटातील सदस्य यांनी सहभाग नोंदवला.

सदर प्रशिक्षणाचे उद्घाटन
राजेंद्र साबळे – प्रकल्प संचालक आत्मा, पुणे व शंतनु जगताप, सहाय्यक संचालक, एम.सी.सी. आय.ए.पुणे, मारुती साळे ,तालुका कृषी अधिकारी, हवेली यांचे हस्ते झाले.

यावेळी खालीलप्रमाणे विषयावर मार्गदर्शन केले. सतीश वराडे, श्रीमती नंदिता खैरे, श्रीमती धनश्री शुक्ला, गोविंद हांडे.

या वेळी मंडळ कृषी अधिकारी गुलाब कडलग, कृषी पर्यवेक्षक मेघराज वाळुंजकर, कृषी सहाय्यक महेश सुरडकर, आत्मा बी टी एम श्रीम रेश्मा शिंदे मॅडम उपस्थित होते.

प्रगतिशील शेतकरी अमित चौधरी, राजेंद्र चौधरी, नंदकुमार चौधरी, अभिजित गाढवे, रोहन चौधरी, विशाल शेलार, अजिंक्य कांचन यांनी उपस्थित राहून प्रशिक्षणाचा लाभ घेतला.

Previous articleराजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने नारायणगावात शिवजयंती उत्साहात
Next articleशिवरायां बद्दल तना-मनात प्रचंड आदर आणि प्रेम असल्याने शिवप्रेमी शिवभक्त खलिल महेमुद शेख यांच्या माध्यमातून शिवजयंती साजरी