राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने नारायणगावात शिवजयंती उत्साहात

किरण वाजगे,नारायणगाव

येथील राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान च्या वतीने तिथीनुसार शिवजयंती उत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. प्रतिष्ठानच्या वतीने सकाळी नारायणगाव ते शिवनेरी किल्ला व पुन्हा नारायणगाव अशी मोटर सायकल रॅली काढण्यात आली. सायंकाळी नारायणगावातून शिवप्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. रात्री शिवव्याख्याते नितीनजी बानुगडे पाटील यांचे शिव व्याख्यान आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमापूर्वी समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचे सन्मान करण्यात आले.


याप्रसंगी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके, विघ्नहर साखर कारखान्याचे संचालक संतोष नाना खैरे, युवा सेनेचे राज्य विस्तारक गणेश कवडे, शरद चौधरी, बाळासाहेब पाटे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष सरपंच योगेश पाटे, राजेश मेहेर, उपसरपंच आरिफ आतार, माया डोंगरे, सहा. पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, डॉ सदानंद राऊत, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ वर्षा गुंजाळ, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पायमोडे, संतोष वाजगे, आशिष माळवदकर, ज्ञानेश्वर औटी, भागेश्वर डेरे, अनिल खैरे, राजेश बाप्ते आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. अल्फा डान्स ॲकॅडमी यांच्यावतीने ऐतिहासिक पावनखिंड या विषयावर नृत्यनाटिका सादर करण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेहबूब काझी, अजित वाजगे, हेमंत कोल्हे, मनोज बेल्हेकर यांनी केले तर आभार ज्ञानेश्वर औटी यांनी मानले.

Previous articleशिवरायांचे जल व्यवस्थापन
Next articleशेतकऱ्यांसाठी ” कृषि निर्यात ” या विषयावर विनामुल्य प्रशिक्षण कार्यक्रम