मंचर येथील आवटे कॉलेजच्या प्राचार्य पदी डॉ.के जी कानडे

प्रमोद दांगट प्रतिनिधी : मंचर (ता.आंबेगाव) येथील अण्णासाहेब आवटे कॉलेजचे प्राचार्य म्हणुन डॉ .के.जी.कानडे हे रुजू झाले आहेत.त्यांना प्राचार्य पदाचा ७ वर्षाचा अनुभव असुन सन २०२०-२०२१ ते २०२२-२०२३ या कालावधीसाठी रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्यपदी त्यांची निवड झालेली आहे.

प्राचार्य डॉ.के.जी.कानडे यांनी रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज पंढरपूर,छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा,महाराजा जिजाजीराव शिंदे कॉलेज श्रीगोंदा या महाविद्यालयामध्ये २ वर्ष व यशंवंतराव चव्हाण सायन्य स्वायंत्त महाविद्यालय सातारा येथे ५ वर्ष प्राचार्य म्हणून काम केले आहे.प्राचार्य डॉ.कानडे हे शेतकरी कुटुंबातील असून त्यांचे मुळ गाव जऊळके बुद्रुक पोस्ट पारगाव तर्फे खेड ता.खेड आहे.त्यांनी अंत्यत प्रतिकुल परीस्थितीमध्ये सर्व वाटचाल केली आहे.संशोधन व व्यवस्थापन यामध्ये त्यांचे विशेष कौशल्य दिसुन येते.त्यांच्या या अनुभवाचा व मार्गदर्शनाचा महाविद्यालयाला निश्चितच चांगला उपयोग होईल.असे कार्यालयीन अधिक्षक प्रभाकर पारधी यांनी सांगितले.

Previous articleश्री क्षेत्र वडगाव काशिंबेग येथे विविध विकास कामांचा भूमिपूजन समारंभ संपन्न
Next articleश्रीकृष्ण जन्मोत्सव साध्या पद्धतीने साजरा