श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग येथे विविध विकास कामांचा भूमिपूजन समारंभ संपन्न

प्रमोद दांगट,मंचर: श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग येथील विविध विकास कामांचा भूमिपूजन समारंभ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते झाला.

राज्याचे कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीक्षेत्र काशिंबेग येथील विविध विकासकामे मंजूर झाली आहे. या विकासकामांचा भूमिपूजन समारंभ नुकताच पार पडला. जिल्हा परिषद शाळेतील दोन वर्गखोल्या बांधणे, सटवाजी बाबा मळा रस्ता करणे, खडक ते सडक उर्वरित रस्ता करणे या कामाचे भूमिपूजन करण्यात आले .या सर्व कामांसाठी 32 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. अशी माहिती जिल्हा परिषद सदस्य अरुणताई दत्ताशेठ थोरात यांनी दिली. वडगाव काशिंबेग येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नवीन इमारतीच्या कामासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही विवेक वळसे पाटील यांनी दिली. शाळेच्या सुरक्षा भिंतीसाठी सहा लाख रुपयांचा निधी विवेक वळसे पाटील व अरुणा थोरात यांनी जाहीर केला.

यावेळी भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे पाटील, पंचायत समितीचे सभापती संजय गवारी, उपसभापती संतोष भोर ,जिल्हा परिषद सदस्य अरुणा दत्ताशेठ थोरात, निलेश स्वामी थोरात, खरेदी-विक्री संघाचे संचालक मारुतीशेठ डोके, राजाबाबू थोरात, सुरेश आण्णा निघोट आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सरपंच बाळासाहेब पिंगळे यांनी केले. सूत्रसंचालन महेश डोके यांनी केले.

Previous articleदुकानाच्या जागेच्या वादातून ६३ वर्षीय बहिणीला भावाने केली लाथाबुक्क्यांनी मारहाण
Next articleमंचर येथील आवटे कॉलेजच्या प्राचार्य पदी डॉ.के जी कानडे