श्रीकृष्ण जन्मोत्सव साध्या पद्धतीने साजरा

Ad 1

अमोल भोसले,उरुळी कांचन – प्रतिनिधी

महानुभाव तत्वज्ञानुसार भगवान गोपाळ कृष्ण हे पहिले अवतार मानले आहे पंरतु महानुभावंच नव्हे तर संपूर्ण सांप्रदायिक जनसमुदाय भगवान गोपाळ कृष्णाला जगमान्य अवतार मानतात. भगवान गोपाळ कृष्णाचा जन्मोत्सव संपूर्ण देशात नव्हे जगभरात मध्ये अति मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. भगवान गोपाळ कृष्ण व्दापार युगाच्या शेवटच्या चरणामध्ये अवतार धारण करुन विज्ञान शक्तीचा स्विकार करुन आपल्या सामर्थ्याने असंख्य लीळा करुन गीतेचे तत्वज्ञान अर्जुनाला निमित्त करुन सुष्टीतील मानव जातीला कैवल्यपद (मोक्ष) प्राप्त करुन देण्याचे सांगितले आहे. श्रावण वद्य अष्टमीला श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

यावर्षी मात्र शासनाच्या आदेशानुसार तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चोहीकडे प्रथमच अत्यंत साध्या पद्धतीने मंदिरात व सदभक्ताच्या घरी सोशल डिस्टनशिंग ठेवून भक्तीभाव पुर्ण गोकुळअष्टमी पार पडली. श्रीकृष्ण अध्यात्मिक प्रतिष्ठान, श्रीकृष्ण मंदिर कोरेगावमुळ (ता.हवेली) तसेच श्रीकृष्ण मंदिर उरुळी कांचन (ता.हवेली) व टिळेकरवाडीयांच्या संयुक्त विद्यमाने श्रीकृष्ण जन्मोत्सवा निमित्ताने याठिकाणी आरती, पुजा अवसर, पाळणा, प्रसाद इत्यादी कार्यक्रम अत्यंत साध्या पध्दतीने साजरे करण्यात आले. कोरेगावमुळ मंदीराचे मुख्य व्यवस्थापक महंत विद्याद्यर शहापूरकर यांनी परमेश्वर चरणी प्रार्थना केली की या आलेल्या कोरानाच्या संकटातून आम्हाला लवकरात लवकर मुक्त करावे.

यावेळी सुबोधमुनी धाराशिवकरबाबा, महंत रविराज पंजाबी, मा.उपसरपंच दत्तात्रय कांचन, मणिभाई देसाई पतसंस्था संचालक शरद वनारसे, आबासाहेब कांचन, श्रीकृष्ण अध्यात्मिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष विठ्ठल कोलते, अनिल बाबा महानुभाव, तुकाराम शितोळे, राजु भंडारी, तुकाराम ताटे, बापु गिरी, बापु बनकर, उमेश सरडेे, राजेंद्र गायकवाड, रामभाऊ बोधे, संत – महंत, तपस्वीनी आदी सदभक्त उपस्थित होते.