पत्रकार प्रतिक गंगणे यांना ‘सत्यशोधक दिनकरराव जवळकर आदर्श पत्रकारिता’ पुरस्कार प्रदान

उरुळी कांचन

पुणे येथील पत्रकार प्रतिक गंगणे यांना सासवड येथे झालेल्या छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलनात ‘सत्यशोधक दिनकरराव जवळकर आदर्श पत्रकारिता’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
जगद्गुरु संत तुकोबाराय साहित्य परषद आयोजित राज्यस्तरीय १३ वे छत्रपती साहित्य संमेलन पार पडले. यामध्ये प्रतिक गंगणे यांना ‘सत्यशोधक दिनकरराव जवळकर आदर्श पत्रकारिता’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष गुलाब वाघमोडे व पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय कोलते यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी ज्येष्ठ साहित्यिक कार्यक्रमाचे संयोजक दशरथ यादव, भा.ल.ठाणगे, पुरंदरचे माजी आमदार अशोक टेकवडे, पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनिल लोणकर, युवा नेते गौरव कोलते, हवेली तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष विजय तुपे, पत्रकार दत्तानाना भोंगळे, अमोल बनकर, राजाभाऊ जगताप, अभिनेत्री संस्कृती बालगुडे यांचेसह अनेक साहित्यिक, लेखक, कवी, व नागरिक उपस्थित होते.

Previous articleसुनिल थोरात यांना राज्यस्तरीय छत्रपती संभाजी महाराज आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
Next articleभानोबानगरच्या शाळेला कुरकुंभ एमआडीसीतील कंपनीकडून पाणी शुद्धीकरण उपकरण भेट