सुनिल थोरात यांना राज्यस्तरीय छत्रपती संभाजी महाराज आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

उरुळी कांचन

हवेली तालुक्यातील हिंगणगाव येथील अहिल्या माता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुनिल आनंदा थोरात (BA.Dted) यांना छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलनात ‘छत्रपती संभाजी महाराज आदर्श शिक्षक’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. अतिशय बिकट परिस्थिती मध्ये शिक्षण पूर्ण केले वाघोली ते हिंगणगाव हे अंतर सायकल प्रवास करून पूर्ण केले तसेच १० वी ते १२ वी शिक्षण कमवा व शिका या योजने अंतर्गत पूर्ण केले असल्याचे थोरात यांनी सांगितले

जगद्गुरु संत तुकोबाराय साहित्य परषद आयोजित राज्यस्तरीय १३ वे छत्रपती साहित्य संमेलन यामध्ये सुनिल थोरात यांना ‘छत्रपती संभाजी महाराज आदर्श शिक्षक’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

साहित्य संमेलनाचे अध्यक्ष गुलाब वाघमोडे व पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय कोलते यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे मुख्य संयोजक ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव, भा.ल.ठाणगे, पुरंदरचे माजी आमदार अशोक टेकवडे, पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे, हवेली तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष विजयराव तुपे, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनिल लोणकर, दत्तानाना भोंगळे, अमोल बनकर, गौरव कोलते, अभिनेत्री संस्कृती बालगुडे, राजाभाऊ जगताप यांचे सह अनेक साहित्यिक लेखक, कवी, व नागरिक उपस्थित होते.

Previous articleबचत गटातील महिलांनी शासकीय योजनांचा लाभ घेत उद्योजक बनावे- आदिवासी विकास प्रकल्प सहाय्यक प्रकल्पधिकारी कैलास खेडकर यांचे आव्हान
Next articleपत्रकार प्रतिक गंगणे यांना ‘सत्यशोधक दिनकरराव जवळकर आदर्श पत्रकारिता’ पुरस्कार प्रदान