बचत गटातील महिलांनी शासकीय योजनांचा लाभ घेत उद्योजक बनावे- आदिवासी विकास प्रकल्प सहाय्यक प्रकल्पधिकारी कैलास खेडकर यांचे आव्हान

घोडेगाव

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने यशवर्धिनी संघाच्या वतीने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.यासाठी सुमारे 700 महिलांची उपस्थिती होती.यावेळी यशवर्धिनी संघाच्या मार्गदर्शनाने सुरू असलेल्या गोहे येथील जय आदिवासी महिला बचत गटाच्या आदिवसी प्रकल्प कार्यालयामार्फत रेनकोट बनविण्याच्या मशीन चे उदघाटन करण्यात आले. बचत गटाला व वैयक्तिकरित्या दिल्या जाणाऱ्या लाभाच्या योजनांची माहिती यावेळी देण्यात आली.

यावेळी संघाच्या अध्यक्षा योगिता बोऱ्हाडे, अलका घोडेकर,अलका डोंगरे,ललिता वरपे कल्पना एरंडे,सुहास वाघ, हरिभाऊ गेंगजे, सीमा कानडे उपस्थित होते

यावेळी महिलांना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या प्रशिक्षक डॉ. पदंमा पोतनीस यांनी योगा विषयावर प्रात्यक्षिक घेतले.गायत्री काळे मॅडम यांनी कोर्ट केसेस संदर्भात मार्गदर्शन केले.

Previous articleमहिला दिनाचे औचित्य साधत ठाकरवस्तीत सुरू झाला प्रौढ साक्षरता वर्ग
Next articleसुनिल थोरात यांना राज्यस्तरीय छत्रपती संभाजी महाराज आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान