महिला दिनाचे औचित्य साधत ठाकरवस्तीत सुरू झाला प्रौढ साक्षरता वर्ग

महिला दिनाचे औचित्य साधत ठाकरवस्तीत सुरू झाला प्रौढ साक्षरता वर्ग

घोडेगाव

महिला दिनाचे औचित्य साधत रोटरी क्लब कोथरूड पुणे यांच्या सहकार्याने व आदिम संस्थेच्या स्थानिक संयोजनातून आमोंडी येथील ठाकरवाडीत प्रौढ साक्षरता वर्गाचे उद्घाटन करण्यात आले.

आमोंडी येथील ठाकरवाडीतील अनेक स्त्रियांना शिक्षण घेता आलेले नाही त्यामुळे त्या निरक्षर असल्याने दैनंदिन व्यवहारांत अनेक वेळा दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागते.यावर उपाय म्हणुन हा प्रौढ साक्षरता वर्ग सुरू करण्यात आला.

यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष श्री.सत्यजित चितळे, त्यांचे सहकारी श्री. उज्वल तावडे, श्री. प्रताप रेगे, श्री.प्रशांत सिद्ध, श्री. मनीष दिडमिशे, श्री. वसंत कुलकर्णी, श्री. सुहर पटवर्धन,आदिम संस्थेचे राजु घोडे, अविनाश गवारी, अर्जुन काळे, सुभाष पारधी आदी यावेळी उपस्थित होते.

उपस्थित महिलांना पाटी,पेन्सिल तसेच साक्षरता वर्गासाठी आवश्यक ते साहित्याचे वाटप करण्यात आले. या साक्षरता वर्गात लेखन, वाचन,अंकगणित याबरोबरच कायदा साक्षरता,आर्थिक साक्षरता, संविधान साक्षरता व आपत्ती व्यवस्थापन साक्षरता याविषयी ही माहिती या वस्तीपातळीवर देण्यात येणार आहे.साक्षरता वर्गाच्या स्वयंसेविका, शारदा केदारी यांचा सत्कार फळा व खडू देऊन अध्यक्षांच्या हस्ते करण्यात आला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश गवारी व आभार प्रदर्शन अर्जुन काळे यांनी केले.

तर कार्यक्रमाचे स्थानिक नियोजन अनिल सुपे, सुभाष पारधी, अजित पारधी, शारदा केदारी, सुवर्णा जाधव यांनी केले.

Previous articleउरुळी कांचन मध्ये श्रीराम पादुका रथयात्रेचे टाळ, मृदुंग, ढोल ताशाचा नगारा वाजवून स्वागत
Next articleबचत गटातील महिलांनी शासकीय योजनांचा लाभ घेत उद्योजक बनावे- आदिवासी विकास प्रकल्प सहाय्यक प्रकल्पधिकारी कैलास खेडकर यांचे आव्हान