उरुळी कांचन मध्ये श्रीराम पादुका रथयात्रेचे टाळ, मृदुंग, ढोल ताशाचा नगारा वाजवून स्वागत

उरुळी कांचन

श्री रामचंद्र आणि सीतामाई यांनी श्रीलंकेमध्ये बिभीषन यांना सुपूर्त केलेल्या पादुकांची प्रतिष्ठापना अयोध्या येथे श्रीराम मंदिरामध्ये होणार असून १ मार्च २०२२ रोजी श्रीरामांच्या पवित्र पादुका घेऊन श्रीराम वनगमन पथकाव्य यात्रा तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, ओडिसा, छत्तीसगड, झारखंड, मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेश मधील २३२ स्थळांना भेटी देऊन १० एप्रिल २०२२ रोजी रामनवमीस अयोध्येमध्ये पोहचत आहे.

दरम्यान शुक्रवारी (११) दुपारी उरुळी कांचन मध्ये श्रीराम पादुका रथयात्रेचे आगमन झाले असता टाळ मृदुंग, ढोल ताशा नगारा वाजवीत आणि संपूर्ण पालखी सोहळ्या वरती फुलांचा वर्षाव करत उरुळी कांचन च्या भूमीत रथयात्रेचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी उरुळी कांचन पंचक्रोशीतून मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या ग्रामस्थांकडून आणि भजनी मंडळाकडून श्रीरामांचा प्रचंड उत्साहा मध्ये जयघोष करण्यात आला. उरुळी कांचन बस स्टॉप येथे श्रीरामांच्या पादुकांची विधीवत पूजा ज्येष्ठ नेते प्रा. के डी (बापु) कांचन, सरपंच राजेंद्र कांचन, संतोष कांचन, भाऊसाहेब कांचन, अमित कांचन, भाऊसाहेब तुपे, सागर कांचन, शंकर बडेकर, शरद खेडेकर व शुभम वेदपाठक यांच्या शुभहस्ते करण्यात आली.

यावेळी ग्रामस्थांनी पवित्र पादुकांचे दर्शन घेतले आणि श्रीरामांच्या जयघोषात रथयात्रा दुपारची न्याहारीसाठी लोणी काळभोर ला श्री रामचंद्रांनी वास्तव्य केलेल्या रामदरा शिवालयात मार्गस्थ झाली.

या सोहळ्याच्या नियोजनात राहुल जाधव, श्रीकांत कांचन, विकास जगताप, अजिंक्य कांचन, अलंकार कांचन, अमित कांचन, खुषाल कुंजीर, निखिल कांचन, सचिन काळे, शुभम वलटे, ऋषिकेश शेळके, अक्षय रोडे, हरीश कांचन, अर्चिस वाडेकर, निखिल सोनवणे, ओंकार कांचन, सुनील तुपे, अजित कांचन, बाळा तुपे, निखिल चोरडिया, पूजा सणस, सविता कांचन, सारिका लोणारी, कविता खेडेकर, मुरकुटे ताई, सुचिस्मिता वनारसे आदी पदाधिकाऱ्यां सोबतच उरुळी कांचन पोलीस व ट्राफिक पोलीस तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांनी संयोजनात मोठा वाटा उचलून सोहळा दिमाखात होण्यास परिश्रम घेतले आहेत.

Previous articleविठ्ठल विकास सोसायटीवर शिवसेनेचा भगवा ; शिवसेनेचे बाळासाहेब पायगुडे चेअरमनपदी
Next articleमहिला दिनाचे औचित्य साधत ठाकरवस्तीत सुरू झाला प्रौढ साक्षरता वर्ग