भानोबानगरच्या शाळेला कुरकुंभ एमआडीसीतील कंपनीकडून पाणी शुद्धीकरण उपकरण भेट

योगेश राऊत,पाटस

पाटस येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भानोबानगर ( ता.दौंड ,जि.पुणे )येथे या शाळेत कुरकुंभ एमआयडीसीला एका कंपनीमार्फत पाणी शुद्धीकरण उपकरण भेट देण्यात आले.ग्रामीण भागात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महत्त्वाची भूमिका बजावत असतात. येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्व सेवा सुविधा चांगल्या प्रतीच्या मिळाव्या यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत आहोतच. अशी प्रतिक्रिया ग्रामपंचायत उपसरपंच छगन म्हस्के यांनी दिली.

या कार्यक्रमासाठी भीमा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक माणिकराव भागवत, ग्रामपंचायत उपसरपंच छगन मस्के , सामाजिक कार्यकर्ते अभिजित शितोळे ,ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल भागवत ,राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल शितोळे ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमोल भागवत, सामाजिक कार्यकर्ते भरत जाधव, तसेच मुख्याध्यापिका वर्षा शितोळे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मधुकरनगर मुख्याध्यापक भोंगाळे सर उपस्थित होते .या सर्वांनी शाळेतील विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत त्यांची विचारपूस केली.

Previous articleपत्रकार प्रतिक गंगणे यांना ‘सत्यशोधक दिनकरराव जवळकर आदर्श पत्रकारिता’ पुरस्कार प्रदान
Next articleकोरोना योद्धांना सेवेत कायम करावे,न केल्यास भारतीय मजदूर संघ उतरणार रस्ता वर- भारतीय मजदूर संघाचा इशारा