पत्रकार श्रावणी कामत यांचा ” तेजस्विनी कर्तृत्व ” पुरस्काराने गौरव

लोणावळा – जय मल्हार सामाजिक चॅरि. ट्रस्ट. महाराष्ट्र व शिवांगी नृत्य मल्हार रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने तेजस्विनी शिवमल्हार गौरव संमेलन आयोजित करण्यात आले होते

स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृह रत्नागिरी येथे सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री किशोरी अंबिये यांच्या शुभ हस्ते पत्रकार श्रावणी( चित्रा) धनंजय कामत यांना समाज सेवा, पत्रकारिता आणि विविध क्षेत्रातील कार्याबद्दल ” तेजस्विनी कर्तृत्व पुरस्कार ” देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी संमेलाध्यक्ष सौं. संगीता घाग. प्रा. डॉ. आनंद अहिरे ,प्रकाश गायकवाड, सौं रेखा महाजन, विलासराव सूर्यवंशी, डॉ. बी. एन. खरात, वैभव खानविलकर आदी मान्यवर उपस्थित होते

Previous articleमहिलांच्या कर्तृत्वास गिर्यारोहकांचा सलाम
Next articleस्व. सचिनशेठ भंडलकर स्पर्धेत कडूस क्रिकेट अकॅडमी विजयी