महिलांच्या कर्तृत्वास गिर्यारोहकांचा सलाम

राजगुरूनगर – जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत टीम पॉईंट ब्रेक ॲडवेंचर्सच्या गिर्यारोहकांनी साम्रद गाव सांदण दरी करोली घाट ते पुन्हा साम्रद गाव ही खडतर पदभ्रमंती मोहीम हाती घेत महिलांच्या कर्तृत्वास सलाम करीत केलेली ही मोहीम स्त्री शक्तीस समर्पित केली.

या मोहीमेची सुरवात साम्रद गाव, ता.अकोले, जि.नगर येथून झाली. अशिया खंडात दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या सांदण दरी मधील दोन अजस्त्र भिंतींमधून खडकाळ टप्यातून मार्गक्रम करावे लागते. काही टप्प्यात गुडघाभर ते अगदी छातीभर साचलेल्या थंडगार पाण्यातून मार्ग काढावा लागतो. त्यानंतर पहिला ७० फूटी टप्पा आणि त्यानंतरचा २० फूटी टप्पा रॅपलिंग करून खाली जावे लागते.

येथून पुढे उतार होऊन ज्या ठिकाणी दरी संपते तेथून पुढे उजव्या बाजूने गेल्यावर करोली घाट मार्ग सुरु होतो. घनदाट जंगलातील खड्या चढाईच्या अडीच तासांच्या मार्गांवर दोन ३० फूटी खडकाळ टप्पे पार करून पुन्हा साम्रद गावात पोहोचता येते.

शारीरिक आणि मानसिक कसोटी पाहणारी खडतर मोहीम, सांदण दरीचा खडकाळ टप्पा आणि रॅपलिंगचा थरार, करोली घाटातील खड्या चढाईचा घनदाट जंगलातील मार्ग अश्या सर्व आव्हानांना सामोरे जात टीम पॉईंट ब्रेक ॲडवेंचर्सच्या चेतन शिंदे, जॅकी साळुंके, पूजा साळुंके, हर्षल पाटील, महेश जाधव, डॉ.संदीप भिंगारदिवे, अनुराग दांडेकर, दीपिका भांड, अनिल खैरनार, संतोष निकम, अरुणा राणे, अरुण पवार, प्रदीप बारी, रॉबिन हिंगणेकर, नितीन जाधव, जयराम हडस, सागर बांडे आणि डॉ.समीर भिसे यांनी मोहीम फत्ते केली.

Previous articleजागतिक महिला दिनानिमित्त श्री.विघ्नहर देवस्थान ट्रस्टच्या वतीने विविध क्षेत्रात सर्वोच्च काम करणाऱ्या आदिशक्ती रुपी महिलांचा सन्मान
Next articleपत्रकार श्रावणी कामत यांचा ” तेजस्विनी कर्तृत्व ” पुरस्काराने गौरव