स्व. सचिनशेठ भंडलकर स्पर्धेत कडूस क्रिकेट अकॅडमी विजयी

राजगुरूनगर- योगेश धायबर क्रीडा संकुल कडूस येथे स्व. सचीनशेठ (पपा) सूर्यकांत भंडलकर ट्रॉफी 19 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेचे आयोजन‌ करण्यात आले‌ होते . या स्पर्धेचे श्री वसंत धायबर, श्री ललित मुसळे व श्री दत्ता पवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.

या स्पर्धेत 16 संघांनी सहभाग घेतला आहे त्यातील आज पहिला सामना रामलिंग स्पोर्ट्स क्लब शिरूर विरुद्ध कडूस क्रिकेट अकॅडमी असा झाला. त्या मध्ये कडुस क्रिकेट अकॅडमी यांनी टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ह्या मध्ये कडुस क्रिकेट अकॅडमीने सर्वबाद 149 धावा केल्या ज्या मध्ये पार्थ पाटील याने 33 चेंडू मध्ये 31 द्यावा , वेदांत गोसावी 27 चेंडू 29 द्यावा तर गोलंदाजी मध्ये आदित्य वाळुंज याने 3.4 ओवर्स मध्ये 4 बळी घेतले ,पार्थ पाटील याने 4 ओव्हर मध्ये 2 बळी घेतल्या .ह्या धावांचा पाठला करताना रामलिंग स्पोर्ट्स क्लब शिरूर संघ अपूर्व बाद 142 धावा करू शकला. ज्या मध्ये लहू डांगे 43 चेंडू 30 धावा ,18 चेंडू 20 धावा. गोलंदाजी मध्ये सिद्धार्थ भांबरे 10 ओव्हर मध्ये 3 बळी ,ओम धात्रक 7.5 ओव्हर मध्ये 3 बळी मिळवल्या.

ह्या सामन्यात कडूस क्रिकेट अकॅडमी यांनी 8 धावांनी विजय मिळविला. सामनावीर म्हणून आदित्य वाळुंज याला गौरवण्यात आले

Previous articleपत्रकार श्रावणी कामत यांचा ” तेजस्विनी कर्तृत्व ” पुरस्काराने गौरव
Next articleकवठे येमाई येथे महिला दिन ऊत्साहात साजरा