श्री भागेश्वर महाराजांच्या यात्रेनिमित्त नारायणगाव ते वारूळवाडी पालखी मिरवणूक उत्साहात

नारायणगाव : (किरण वाजगे)

नारायणगाव वारूळवाडी गावचे श्रद्धास्थान असलेल्या श्री भागेश्वर महाराजांच्या यात्रेनिमित्त आज नारायणगाव ते वारूळवाडी अशी पालखी मिरवणूक उत्साहात पार पडली. या मिरवणुकीसाठी पारंपारिक वाद्य, ढोल ताशा पथक, तसेच बँड पथक व डिजे आधदी वाद्यांचा ताफा मिरवणुकीत सहभागी झाला होता.

याप्रसंगी जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके, मनसेचे उपजिल्हा प्रमुख मकरंद पाटे, तसेच युवा नेते अमित बेनके, उद्योजक संजय वारुळे, माजी उपसरपंच सचिन वारूळे, उद्योजक संजय मुथ्था, श्रीकांत पाटील, मुकेश वाजगे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रोहिदास केदारी, रत्नाकर सुबंध सर, करण परदेशी, राहुल कोकणे, पराग शहा, बनकर, मेहेर, कानडे, भुजबळ, अडसरे, कोल्हे, संते, गुंजाळ, माने या जथ्यांमधील कार्यकर्ते तसेची ग्रामपंचायत वारूळवाडी चे पदाधिकारी, कर्मचारी व भागेश्वर मित्र मंडळाचे कार्यकर्ते या पालखी मिरवणुकीत सहभागी झाले होते. याप्रसंगी अनेक महिलांनी डोक्यावर घागरी घेऊन पालखी मिरवणुकीत सहभाग घेतला.
ही पालखी मिरवणूक नारायणगाव येथील हनुमान मंदिरापासून निघून बाजारपेठ एसटी स्टँड मार्गे मीनानदी वरील मोठ्या मुलाच्या बाजूने वारूळवाडी येथील भागेश्वर मंदिराकडे रवाना झाली.

सकाळपासून रात्रीपर्यंत भागेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकांना मंदिर देवस्थान व दानशूर व्यक्तींच्या वतीने खिचडी प्रसाद, तसेच राजगिरा लाडू व केळी आदी महाप्रसाद देण्यात आला.

यावेळी कलाकार सुनिल मेहेर प्रस्तुत स्वरयात्री हा भक्ती गितांचा कार्यक्रम सादर करण्यात आला.

याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके, संतोष नाना खैरे, सरपंच योगेश पाटे, राजेंद्र मेहेर, सुजित खैरे, पराग शहा, जितेंद्र गुंजाळ, संजय परदेशी, कैलास पानसरे, संजय खैरे, उद्योजक संजय वारूळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Previous articleपद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा
Next articleदौंड खेळाडूंचे फ्लाईन किंक बॉक्सिंग मध्ये नेत्रदीपक कामगिरी