पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा

उरुळी कांचन

महात्मा गांधी सर्वोदय संघ संचलित पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालय उरुळी कांचन मराठी विभाग विद्यार्थी विकास मंडळ, ग्रंथालय विभाग व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. आर. के. अडसूळ होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. एस. व्ही. आबनावे यांनी केले. विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. ए. पी. बोत्रे यांनी मराठी भाषेचे महत्त्व सांगताना कविवर्य कुसुमाग्रज यांच्या कार्याचा आढावा घेतला.

अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ.आर के अडसूळ यांनी मराठी भाषेचा गौरव करताना सर्वांनी व्यवहारात मराठी भाषेचा आग्रह धरला पाहिजे,आपल्या भाषेतून विचारांची देवाण-घेवाण केली तर भाषेला वैभव प्राप्त होईल असे मत मांडले.

मराठी विभागातर्फे ‘मराठी विभागाचे पोस्टर प्रदर्शन’, ‘ग्रंथप्रदर्शन’ व ‘मराठी सामान्य ज्ञान परीक्षा’ असे उपक्रम घेण्यात आले. ‘मराठी सामान्यज्ञान परीक्षा’या परीक्षेत १३० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. एस. व्ही. आबनावे यांनी केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. साबळे एस.बी. यांनी केले यावेळी प्रा. एस. यु. पवार, प्रा. एल. बी.अडाले , प्रा.आर. एस भाकरे, प्रा. आर. एस. बारवकर, प्रा. बी व्ही. उगाडे, प्रा. कानकाटे व्ही.एन. उपस्थित होते. बहुसंख्येने विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला.

Previous articleमराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी 1 मार्च ला दौंड बंद – मराठा क्रांती मोर्चा
Next articleश्री भागेश्वर महाराजांच्या यात्रेनिमित्त नारायणगाव ते वारूळवाडी पालखी मिरवणूक उत्साहात