संस्कार स्कुल मध्ये मराठमोळ्या कलाविष्कारात मराठी राजभाषा दिन साजरा

दिनेश पवार : दौंड

संस्कार स्कुल दौंड येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत बडबड गीते,मराठी व्याकरण,मराठी गीते,कविता,नृत्य या मराठमोळ्या कलाविष्काराने मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला, निसर्ग संपन्न परिसर,पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, विद्यार्थ्यांची कलाविष्कार सादर करण्याचा आत्मविश्वास,प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन आशा उत्स्फूर्त तयारीत हा कार्यक्रम घेण्यात आला,विद्यार्थी इंग्रजी माध्यमात शिकत असताना देखील मराठी व्याकरण,वाचन,भाषण,कविता या सर्व गोष्टी परखडपणे विद्यार्थी सादर करत होते.

यावेळी प्रमुख पाहुणे,प्रा.दिनेश पवार,साने मॅडम,स्वप्नील शाह,युवराज सर,सहाय्याक पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड,शेलार सर उपस्थित होते,प्रमुख मान्यवरांचा सन्मान स्कुल चे अध्यक्ष जयंत पवार यांच्या हस्ते करण्यात आला,शालेय शिक्षणाबरोबर घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला, प्रा.दिनेश पवार यांनी मराठी राजभाषा या विषयावर मार्गदर्शन केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक गीतांजली ढोले सूत्र संचालन जोशी मॅडम तर
आभार प्रदर्शन पल्लवी मॅडम यांनी केले

Previous articleकवठेयेमाईत महाशिवरात्री निमित्त अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन
Next articleनारायणगाव येथील रक्तदान शिबिरात १६९ रक्तदात्याचे रक्तदान