कवठेयेमाईत महाशिवरात्री निमित्त अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन

धनंजय साळवे,कवठे यमाई

फत्तेश्वर मंदिर कवठेयेमाई येथे महाशिवरात्री निमित्त अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.गेली एकवीस वर्ष अखंडीत ह्या सप्ताहाचे आयोजन केले जाते .यंदा बावीसावे वर्ष आहे.ह.भ.प.बापुसाहेब महाराज कुंभळीकर यांच्या प्रेरणेने हा सप्ताह भरविला जातो.

दिनांक २३/०२/२०२२ ते ०२/०३/२०२२ यादरम्यान सप्ताहाचे नियोजन करण्यात आले आहे.दररोज पहाटे काकडा आरती, सकाळी शिवलिला पारायण,नंतर हभप मधुकर शिंदे यांची अभंगवाणी, हरिपाठ,बाल महिला भजनी मंडळ यांचे रात्रौ सात ते नऊ हरिकिर्तन व रात्रौ नऊ नंतर महाप्रसाद व जागर अशी कार्यक्रमाची रुपरेशा असते.मंगळवार दिनांक ०२/०३/२०२२ सकाळी हभप शिवचंद्रमहाराज शेळके यांचे काल्याचे किर्तन होईल व त्या नंतर महाप्रसाद होईल .महाप्रासादाचे अन्नदाते श्री .कारभारी जिजाबा मेरगळ यांच्या तर्फे गेली एकवीस वर्षे केले जात आहे.दि.०१/०३/२०२२ रोजी सकाळी १० ते सायं.४वाजेपर्यंत शाहीर शिवाजी पवार कलगीवाले व शाहीर साहेबराव पवार तुरेवाले यांचा कलगी तुर्याचा कार्यक्रम होईल.

Previous articleशामशेठ पवळे यांचा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ‘कृषिनिष्ठ पुरस्काराने गौरव’
Next articleसंस्कार स्कुल मध्ये मराठमोळ्या कलाविष्कारात मराठी राजभाषा दिन साजरा