नारायणगाव येथील रक्तदान शिबिरात १६९ रक्तदात्याचे रक्तदान

नारायणगाव : किरण वाजगे

जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे श्री नवनाथ मित्र मंडळ व समस्त शिवशंभु पाईक यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात १६९ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे राज्यसभेचे खासदार युवराज छत्रपती संभाजी राजे यांनी देखील या रक्तदान शिबिराला भेट देऊन आयोजकांचे कौतुक केले.
या रक्तदान शिबिरास माजी आमदार शरद सोनवणे, सरपंच योगेश पाटे, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोष नाना खैरे, भाजपचे ज्येष्ठ नेते आशिष माळवदकर, मनसेचे उपजिल्हाध्यक्ष मकरंद पाटे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा पदाधिकारी रमेश हाडे, शरद पोखरकर, गणेश दहिभाते, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुरज वाजगे, युवानेते सुजीत खैरे, हर्षल वाजगे, विनायक भुजबळ, गणेश पाटे आदी मान्यवर या शिबिरास उपस्थित होते.

या वेळी छत्रपती युवराज खा. संभाजीराजे यांनी श्री नवनाथ मंडळाच्या विविध समाजपयोगी कार्यक्रमांचे कौतुक करत मंडळाच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.एवढी युवराज संभाजीराजे यांनी मंडळाच्या रक्तदान शिबिरास अचानक भेट दिल्याने सर्वांनीच आनंद व्यक्त केला व संभाजीराजे यांचे आभार व्यक्त करत त्यांचा सन्मान देखील केला कार्यक्रमाचे आयोजन श्री नवनाथ मित्र मंडळाचे प्रमुख ऋषी वाजगे, रुपेश वाजगे, संतोष डिंबळे, विकी वाजगे, नीलेश वाजगे, सनी चौधरी व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी यशस्वीरित्या केले.

Previous articleसंस्कार स्कुल मध्ये मराठमोळ्या कलाविष्कारात मराठी राजभाषा दिन साजरा
Next articleमोहळाच्या माशांचा ३० विद्यार्थ्यांचा घेतला चावा