श्री समर्थ विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी

चाकण- श्री समर्थ स्कूल अँड कॉलेज, खराबवाडी, चाकण येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. ढोल ताशाच्या गजरात कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले असल्याची माहिती प्राचार्या सौ.विद्या पवार यांनी दिली.

या प्रसंगी, कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ. रेशमा पवार, प्रमुख पाहुणे श्री. राजुशेठ कड, अश्विनी देवकर , मयुरी बिरदवडे, दीपक सहाने, तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी सहशिक्षक व प्राचार्या सौ. विद्या पवार, यांनी शिवरायांच्या व्यक्तिमत्त्व गुणविशेष वर प्रकाश टाकत मुलांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजां सारखं निश्चयाचा महामेरू होऊन आपले ध्येय पूर्ण केलं पाहिजे. आई वडील वडीलधार्‍या माणसांचा नेहमी मान ठेवला पाहिजे असे सांगितले.विद्यार्थ्यांनी शिवकालीन वेशभूषा करून शिवगीते,नृत्य,नाटक ,पोवाडे व भाषणे सादर केली. त्यानंतर शिक्षकांनीही आपले शिवाजी महाराजांबद्दलचे विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर गाडे व साची ओसवाल यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री समर्थ स्कूल अँड जुनियर कॉलेजचे सर्व शिक्षक वृंद तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.

श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय शिवाजीराव बबनराव गवारे सर व सचिव सौ. विद्याताई शिवाजीराव गवारे यांनी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले तसेच सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. सौ. अर्चना पोखरकर यांनी सर्वांचे आभार मानले.

Previous articleनिराधार पेन्शन योजनेत वाढ करण्याची किसान सभेची राज्यशासनाकडे मागणी
Next articleऊसतोड कामगारांच्या पालावर जाऊन मुलांना पोलिओचा ढोस !!