ऊसतोड कामगारांच्या पालावर जाऊन मुलांना पोलिओचा ढोस !!

धनंजय साळवे,कवठे येमाई

२७ फेब्रुवारी म्हटले की पोलिओच्या ढोसची सर्वांना आठवण येते. भारतातून पोलिओचे उच्चाटन झाले असले,तरी काही देशांमध्ये पोलिओ अजूनही आहे त्यामुळे शासन दर वर्षी पल्स मोहीम राबवत असते.आरोग्य कर्मचारीही सरकारी दवाखाना, पोलिओ बुथ वर ही मोहीम राबवत असतात त्याच बरोबर कर्मचारी एसटी बस स्थानक व घरोघर जाऊन पाच वर्षाच्या आतील लहान मुलांना पोलीओचा ढोस देत असतात. पराग सहकारी कारखान्याच्या उसतोड मजुरांच्या पालावरही त्यांच्या मुलांना पोलिओचा ढोस देण्यात आला.

या मोहिमेत डॉ. प्रदीप बिक्कड (वैद्यकीय अधिकारी )आरोग्य वर्धिनी केंद्र टाकळी हाजीचे श्री. भरत सोदक (आरोग्य सहाय्यक ),श्री. लक्ष्मण थोंगिरे (आरोग्य सहाय्यक ),सुवर्णा थोपटे (आरोग्य सहायिका ),श्री. विनायक गोसावी, श्री. महेश दहिवळ(आरोग्य सेवक )श्री. महेश राठोड,श्री.शिवाजी पोकळे यांनी भाग घेतला.

ऊस तोड कामगार हे आपले हक्काचे गाव सोडून पोटापाण्यासाठी कारखान्याचा रास्ता धरत असतात. परंतु त्यांच्या मूलांनाही पल्स पोलीओचा ढोस वेळेत मिळावा म्हणून शासन व आरोग्य कर्मचारी प्रयत्न करत असतं . कोणतेच मूल पोलिओ ढोस पासून वंचित राहू नये म्हणून आरोग्य कर्मचारी प्रयत्न करत असतात. या सर्व कर्मचाऱ्यांचे परिसरातून कौतुक होत आहे.

Previous articleश्री समर्थ विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी
Next articleशामशेठ पवळे यांचा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ‘कृषिनिष्ठ पुरस्काराने गौरव’