निरंकारी सद्गुरू बाबा हरदेव सिंह जी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ निरंकारी मिशन तर्फे देशभरात मोफत नेत्रचिकित्सा शिबिरे, स्वच्छता व वृक्षारोपण अभियान

उरुळी कांचन

संत निरंकारी मिशनच्या वतीने बाबा हरदेवसिंहजी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या जन्मदिनी मिशनच्या सेवादारांकडून कोरेगावमूळ, उरुळी कांचन सेक्टर – अव्हाळवाडी या ठिकाणच्या ‘ वननेस वन ‘ प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. या ठिकाणी १०००० हजारपेक्षा अधिक वृक्ष लावण्यात येणार आहेत तसेच त्यांची देखभालही करण्यात येणार आहे. ज्यायोगे प्रदूषणाचा स्तर कमी होऊ शकेल आणि प्राणवायुची निर्मिती अधिकाधिक प्रमाणात होऊ शकेल जो मानवी जीवनासाठी अत्यावश्यक आहे.

या व्यतिरिक्त कोरोनाच्या कालखंडात जेव्हा भारतभर इस्पितळांमध्ये ऑक्सीजनचा तुटवडा निर्माण झाला होता तेव्हा मिशनच्या वतीने ‘वननेस वन परियोजने अंर्तगत २१ ऑगस्ट, २०२१ रोजी संपूर्ण भारतात जवळपास ३५० ठिकाणी दिड लाखाहुन अधिक वृक्ष लागवड करण्यात आली. त्याचबरोबर त्यांची देखभाल करण्यासाठी तीन वर्षे दत्तक घेऊन त्यांचे पालनपोषण करण्याचाही संकल्प करण्यात आला. याचबरोबर निरंकारी सत्संग भवन गंगाधाम, बिबवेवाडी या ठिकाणी मोफत नेत्रचिकित्सा शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिराला आजूबाजूच्या परिसरातून उत्तम प्रतिसाद मिळाला. संपूर्ण भारतात १६ राज्यात ६१ निरंकारी सत्संग भवनांमध्ये मोफत नेत्रचिकित्सा शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. याशिवाय ज्या नेत्ररुग्णांच्या बाबतीत मोतीबिंदू निष्पन्न होईल त्यांचे ऑपरेशन सरकारी इस्पितळांमध्ये करण्यात येणार आहे. गरजू रुग्णांना मिशनच्या वतीने मोफत औषधे व चश्मे वाटण्यात येणार आहेत. याचबरोबर ज्या ठिकाणी मिशनची सत्संग भवन आहेत त्या ठिकाणच्या परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सर्वांना विदितच आहे, की निरंकारी बाबा हरदेवसिंहजी यांच्या सान्निध्यात संत निरंकारी मिशनने आध्यात्मिक जागृतीच्या माध्यमातून जगाला प्रेम, दया, करुणा, एकत्व यांसारख्या उदात्त भावनांशी जोडून भिंतीविरहित जगाची परिकल्पना साकार केली. त्यांनी आपल्या भक्तांना आध्यात्मिकतेबरोबरच मानवता व प्रकृतीची सेवा करत आपल्या कर्तव्यांचे पालन करण्याची प्रेरणा दिली. यावेळी सरपंच विठ्ठल शितोळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जगताप, भाजपच्या प्रदेश महिला सचिव सारिका लोणारी, सेक्टर संयोजक दत्तात्रेय सातव आदी उपस्थित होते. अशी माहिती संत निरंकारी मिशनचे पुणे झोन प्रभारी ताराचंद करमचंदानी यांनी दिली. या सर्व उपक्रमांचे आयोजन कोविड-१९ च्या दिशा-निर्देशांचे पालन करत करण्यात आले .

Previous articleकुरकुंभ ते हडपसर पीएमटी बस आजपासून सुरू : कांचनताई कुल यांच्या हस्ते बसची पूजा‌
Next articleअद्वैत क्रीडा केंद्राच्या वतीने क्रिडा रत्न पुरस्कारांचे वितरण