अद्वैत क्रीडा केंद्राच्या वतीने क्रिडा रत्न पुरस्कारांचे वितरण

उरुळी कांचन

अद्वैत क्रिडा केंद्राचे वतीने “अद्वैत क्रिडा रत्न पुरस्काराचे “वितरण जिल्हा क्रिडा अधिकारी महादेव कसगावडे यांचे हस्ते आज लोकमान्यनगर येथील अद्वैत क्रिडा केंद्राचे कार्यालयात हा समारंभ पार पडला या प्रसंगीत प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कसबा विभागाचे कार्याध्यक्ष दिपकजी पोकळे, आंतरराष्ट्रीय खेळाडू दत्तात्रय सरडे उपस्थित होते.

या प्रसंगी पै.सचिन मोहोळ ( कृस्ती), पै.तुषार गोळे ( कुस्ती), कार्तिक दिसले (जलतरण), मंगेश पठारे (खो खो ), रूपा जाधव (गोफण आंतर राष्ट्रीय खेळाडू ), तरंग येवले (वॉटर पोलो राष्ट्रीय खेळाडू), साई शिंदे (बॉक्सिंग ), पूर्वी गांजवे (लाठी काठी), तन्वी उभे (खो खो), धनश्री आंग्रे (खो खो) या सर्व गुणी खेळाडूंना त्यांचे खेळातील प्राविण्य बद्दल ” अद्वैत क्रिडा रत्न पुरस्कार-2022 देऊन गौरवण्यात आले.

या प्रसंगी संजय कांबळे-क्रिडा मार्गदर्शक, धनंजय मदने-आंतरराष्ट्रीय खेळाडू, राष्ट्रीय मुष्टीयुद्ध खेळाडू कैलास गायकवाड, महेंद्र जव्हेरी , राजेंद्र शिरोळे, प्रसाद जाधव, संभाजी वाघ, राहुल देखणे, सचिन शिंदे, रणजित बहिरट पाटील, दिपाली पाडाळे, भाग्यश्री बोरकर, मीलन पवार, आदी मान्यवर उपस्थित होते त्याचप्रमाणे राष्ट्रवादी क्रिडा सेलचे संघटक संजय चव्हाण, प्रसाद शेवाळे देखील उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्तविक संस्थेचे अध्यक्ष डॉ.मदन कोठुळे यांनी केले. आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव युवराज दिसले तर सूत्र संचालन जयराज मोरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनिल बेहरे व उद्धव पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.

Previous articleनिरंकारी सद्गुरू बाबा हरदेव सिंह जी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ निरंकारी मिशन तर्फे देशभरात मोफत नेत्रचिकित्सा शिबिरे, स्वच्छता व वृक्षारोपण अभियान
Next articleविद्यार्थी विकास मंडळ अंतर्गत निर्भय कन्या अभियान कार्यक्रमात ‘स्वसंरक्षण’ या विषयावर कार्यशाळा संपन्न