कुरकुंभ ते हडपसर पीएमटी बस आजपासून सुरू : कांचनताई कुल यांच्या हस्ते बसची पूजा‌

कुरकुंभ,सुरेश बागल

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या हडपसर ते कुरकुंभ आणि कुरकुंभ ते हडपसर या नवीन बस मार्गाचे उद्धघाटन समारंभ आज (दि. २४) जिल्हाध्यक्षा भाजपा महिला आघाडी पुणे कांचनताई राहुल कुल यांच्या हस्ते करण्यात आले.

ट्राफिक जाम होऊ नये म्हणून कुरकुंभ चौकातील फिरंगाई माता मंदिराच्या कमानी समोर बस उभा करून बसची पुष्पहार व श्रीफळ अर्पण करून कांचनताई कुल यांच्या हस्ते पूजा करण्यात आली.या कार्यक्रमाचे आयोजन चौकातील सोलापूर पुणे हायवे ब्रिज खालील मोकळ्या जागेत करण्यात आले होते.

कुरकुंभ ते हडपसर ही पी. एम. पी. बस सुरू झाल्यामुळे सर्व कुरकुंभ औद्योगिक वसाहत मधील कामगार, शालेय विद्यार्थी आणि अन्य नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे. बस सुरु झाल्यामुळे प्रवासाचा मार्ग सोपा झाला आहे. कुरकुंभ ते पुणे शहरामध्ये अगदी ७१ रुपयांमध्ये पी. एम. पी. बसने प्रवास करून माघारी येत असल्याने स्थानिक नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात आनंद व्यक्त होत आहे

या कार्यक्रमाला सहव्यवस्थापक पी एम टी नगरसेवक पुणे श्री प्रकाशभाऊ ढोरे,सरचिटणीस भाजपा पुणे शहर गणेशभाऊ घोष (खंडाळकर ) ,कुरकुंभ विद्यमान सरपंच आयुब शेख, उपसरपंच विनोद शितोळे, माजी उपसरपंच सुनील पवार, माजी उपसरपंच शिवाजी भागवत,सदस्य जाकीर शेख, पांढरेवाडी सरपंच छाया नानासाहेब झगडे, पाटसचे सरपंच, कुरकुंभ फिरंगाई माता विद्यालयाचे मुख्याध्यापक भापकर सर, वरीष्ठ पत्रकार संजय सोनवणे, दौंड साप्ताहिक अहिल्या टाईम्स चे संपादक राजेंद्र सोनवलकर, विलास कांबळे,अनिल साळुंखे, अलीम सय्यद,आणि सुरेश बागल उपस्थित होते.

कुरकुंभ ग्रामपंचायत विद्यमान सरपंच आयुब शेख, पांढरेवाडी ग्रा. सरपंच छाया नानासाहेब झगडे, पाटस चे सरपंच, माजी आमदार रमेश आप्पा थोरात,खासदार सुप्रिया सुळे,
आमदार राहुल कुल यांच्याकडून कागदोपत्री निवेदन देऊन पी एम टी बस सुरू होण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत झाली आहे.

Previous articleकवठे येमाई व मुंजाळवाडी सोसायटीच्या निवडणुकीसाठी हालचालींना वेग
Next articleनिरंकारी सद्गुरू बाबा हरदेव सिंह जी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ निरंकारी मिशन तर्फे देशभरात मोफत नेत्रचिकित्सा शिबिरे, स्वच्छता व वृक्षारोपण अभियान