कवठे येमाई व मुंजाळवाडी सोसायटीच्या निवडणुकीसाठी हालचालींना वेग

धनंजय साळवे

कवठे येमाई – शिरूर तालुक्यातील एक राजकीय दृष्ट्या महत्वाचे गाव म्हणून कवठे येमाई हे गाव ओळखले जाते. हे गाव सध्या आंबेगाव विधानसभा क्षेत्रात येते. कवठे वि.का. सेवा. सह. मर्या. कवठे येमाई सोसायटी मध्ये २३२४ एकूण सभासद असून १८९३ पात्र मतदार आहेत. थकबाकीदार सभासद मतदार संख्या २५५ आहे. मयत सभासद संख्या १७६ आहे.हि निवडणुक ०५/०३/२०२२ व बापूसाहेब गावडे वि.का. सेवा. सह. मर्या.मुंजाळवाडी सोसायटीची निवडणूक रविवार दि. २७/०२/२०२२ रोजी होत आहे. मुंजाळवाडी सोसायटी निवडणुकीसाठी क्रियाशील सभासद ३२३ आहेत. तर थकबाकीदार सभासद ०७ आहेत व मयत सभासद २९ आहेत.

मुंजाळवाडी सोसायटी साठी जगदंबा ग्रामविकास परिवर्तन पॅनेल व जगदंबा सहकार विकास पॅनल या दोन तुल्यबळ पॅनल मध्ये सरळ निवडणुक होत आहे. दोन्ही पॅनलचे नारळ रविवारी फोडून प्रचाराला सुरुवात झाली आहे. मुंजाळवाडी सोसायटीची निवडणूक अतिशय अटीतटीची होण्याची शक्यता आहे. श्री अंकुश भागाजी उघडे हे बिनविरोध संचालक म्हणून निवडून आले आहेत. कवठे वि.का. सेवा. सह. मर्या. कवठे येमाई या सोसायटीच्या निवडणूकीसाठीही हालचालींना वेग आला आहे.कवठे सोसायटीसाठी निवडणूक हि चुरशीची होणार आहे नेते मंडळीना आपल्या हक्काच्या कार्यकर्त्यांना मानाचे स्थान देण्याची संधी या निवडणूकीमुळे मिळत असते. ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या अर्थकारणात सोसायटयांची महत्वाची भूमिका असते. सहकारी बँक व शेतकरी यांच्या मधील महत्वाचा घटक सहकारी सोसायटी असते. अनेकांची राजकीय जीवनाची सुरुवात येथूनच होत असते.ह्या निवडणुकीत गावातील अनेक दिग्गज उभे असल्यामुळे तालुक्याचे लक्ष ह्या निवडणुकीवर असेल.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा मार्ग येथुनच जात असतो.मतदार कोणाला कौल देईल हे गुलदस्त्यातच राहील..

Previous articleपुणे जिल्हा वारकरी साहित्य परिषदेची हवेली तालुका कार्यकारणी जाहीर
Next articleकुरकुंभ ते हडपसर पीएमटी बस आजपासून सुरू : कांचनताई कुल यांच्या हस्ते बसची पूजा‌