उंडवडी विविध कार्यकारी सोसायटी बिनविरोध ; १११ वर्षांची परंपरा कायम

उरुळी कांचन

उंडवडी विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक कार्यक्रम २०२२ ते २०२७ गेल्या महिन्यात लागला होता. फॉर्म भरण्याच्या शेवटच्या ४ तारखेला एकूण २३ अर्ज आले होते. आज दिनांक २२ रोजी फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवशी १० उमेदवारांनी आपले फॉर्म माघारी घेतल्यामुळे सोसायटीची निवडणूक यंदाही बिनविरोध झाली. उंडवडी विविध कार्यकारी सोसायटी ची स्थापना १९११ साली झाली. गेल्या १११ वर्षापासून बिनविरोध होण्याची परंपरा कायम राखली आहे.

बिनविरोध उमेदवार पुढील प्रमाणे:-
माणिक कांबळे, रामचंद्र दोरगे, शांताराम गुंड, नामदेव दोरगे, सावकार दोरगे, संदीप दोरगे, प्रताप दोरगे, श्रीधर पांढरे, विजय सोनवणे, बाजीराव मेमाने, दत्तात्रय गडदे, मंदाकिनी शिर्के, ताराबाई होले.

यावेळी सोसायटी बिनविरोध करण्यासाठी भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याचे संचालक माणिक कांबळे, शामराव दोरगे, सचिन गुंड, सर्जेराव दोरगे, दिनेश गडदे, रवी पांढरे, रोहिदास जाधव, जयसिंग होले तसेच गावातील सर्व नागरिकांनी प्रयत्न केले.

Previous articleखासदार डॉ. कोल्हे यांच्या संकल्पनेतील ‘इंद्रायणी मेडिसिटी प्रकल्प राज्याच्या आरोग्य व्यवस्थेत मोलाची भर टाकणारा – अजितदादा पवार
Next articleभरकटलेल्या जीवनाला सावरण्याचे काम विद्यार्थ्यांनी श्रमसंस्कार शिबिरातून करावे -आंबेगाव तहसिलदार रमा जोशी