भरकटलेल्या जीवनाला सावरण्याचे काम विद्यार्थ्यांनी श्रमसंस्कार शिबिरातून करावे -आंबेगाव तहसिलदार रमा जोशी

घोडेगाव – येथील आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचालित बी. डी. काळे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन आमोंडी ता.आंबेगाव येथे नुकतेच करण्यात आले होते.स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि माझी वसुंधरा अभियान अंतर्गत या मुख्य हेतूने सुरू झालेल्या या श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन आंबेगाव पंचायत समितीचे सभापती मा.संजय गवारी यांचे शुभहस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन अॕड.संजय आर्विकर हे होते.

उद्घाटनपर भाषणात गवारी म्हणाले की,सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहवासातून सामाजिक जीवनाचे संस्कार होतात.ते विद्यार्थ्यांनी आत्मसात करावेत.देशाच्या हितासाठी काम करणारे कार्यकर्ते राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या श्रमसंस्कार शिबिरातून घडत असतात. समाजातील विविध समस्या जाणून घेण्याची क्षमता यानिमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये रुजविली जाते. देश घडविण्यासाठी जे हात लागतात ते हातही या श्रमसंस्कार शिबिरातून घडत राहतात. अशा प्रकारच्या श्रमसंस्कार शिबिरांमधून देश घडविण्याची चळवळ विद्यार्थ्यांनी निर्माण केली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली. या श्रमसंस्कार शिबिरामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आंबेगाव तालुक्याच्या तहसिलदार मा.रमा जोशी उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या भाषणातून या श्रमसंस्कार शिबिरांमध्ये सहभागी झालेल्या बहुसंख्य विद्यार्थिनींचे कौतुक केले.

सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी या श्रमसंस्कार शिबिरातून आपल्याला जी संधी मिळणार आहे. त्या संधीचा लाभ करून घ्यावा.या शिबिरातून आयुष्यभर उपयोगी पडेल अशा प्रकारचे संस्कार या शिबिरांमधून घडणार आहे.हा आठवणीचा ठेवा विद्यार्थ्यांनी जपून ठेवावा. कोरोनाच्या काळात गावाचे गावपण हरवले होते.अशा प्रकारच्या श्रमसंस्कार शिबिरातून हरवलेपणाची उणीव भासणार नाही.संस्कार, ज्ञान,माहिती, इ.च्या आधारे विद्यार्थ्यांना अहवाल लेखनाची सवय निर्माण होणार आहे. या शिबिरांमधून विद्यार्थ्यांनी आपल्या मातीशी नातं जोडावं.मातीशी नातं जोडल्यानंतर एक वेगळी अनुभूती विद्यार्थ्यांना प्राप्त होईल. एवढेच नव्हे तर आजच्या विद्यार्थ्यांनी आभासी जगामध्ये वावरण्यापेक्षा आपले गाव, आपले शेजारी, या सर्वांशी आपण संबंधित राहावे. भरकटलेल्या जीवनाला सावरण्याचे काम विद्यार्थ्यांनी या शिबिराच्या माध्यमातून करावे, अशा प्रकारची एक अपेक्षा शेवटी त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत असताना महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन अॕड. संजय आर्विकर म्हणाले की, श्रमसंस्कार शिबिरांमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपले आरोग्य उत्तम राखावे. चांगल्या आरोग्यामुळेच बुद्धी,पैसा इ.चा वापर शक्य आहे.अशा प्रकारच्या श्रमसंस्कार शिबिरातून विद्यार्थ्यांनी उत्तम नागरिक बनले पाहिजे.अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. प्रमुख उपस्थितीमध्ये बोलताना संस्थेचे उपाध्यक्ष मा.तुकाराम काळे आपल्या भाषणात म्हणाले की,या श्रमसंस्कार शिबिरांमधून विद्यार्थ्यांनी या गावातील विविध प्रकारच्या समस्या समजून घ्याव्यात.या शिबिरांमध्ये सहभागी झालेले सर्व विद्यार्थी आणि गावातील तरुण,ग्रामस्थ, शिक्षणप्रेमी इ. च्या सहभागाबद्दल त्यांनी कौतुक केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.इंद्रजित जाधव, आमोंडीचे सरपंच श्री. निलेश काळे इ.नी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी उपप्राचार्य प्रोफेसर डॉ.ज्ञानेश्वर वाल्हेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती श्री.प्रकाश घोलप, श्री.राम फलके, श्री.माऊली काथेर,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.धनंजय फलके,श्री.वसंतशेठ फलके, श्री.विलास फलके, पोलीस पाटील नीलमताई फलके, श्री.नवनाथ फलके, श्री.पंढरीनाथ फलके, सावित्रा काथेर, श्री.अंकुश काळे, श्री.सुरेश फलके, श्री.मारुती फलके, श्री.अशोक फलके,श्री.शंकर टेकवडे, श्री.आकाश फलके, उपसरपंच श्री.शंकर काळे, श्री.गिरी सर,श्री.लेंभे सर, प्रा.विशाल फलके इ. मान्यवर यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉ.वल्लभ करंदीकर यांनी केले तर, सूत्रसंचालन डॉ.माणिक बोराडे यांनी केले. शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रा.पोपटराव माने यांनी मानले.

Previous articleउंडवडी विविध कार्यकारी सोसायटी बिनविरोध ; १११ वर्षांची परंपरा कायम
Next articleबिरसा ब्रिगेड वर्धापन दिनानिमित्त आदिवासी समाज प्रबोधन महामेळावा संपन्न