चंद्रकांत भवारी नेट परीक्षा उत्तीर्ण

घोडेगाव – येथील आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचालित बी.डी.काळे महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर मराठी विभागाचे माजी विद्यार्थी श्री.भवारी चंद्रकांत बाळू(गोहे बु.) हे UGC ने जुन २०२१ मध्ये सहाय्यक प्राध्यापक पदासाठी घेतलेल्या राष्ट्रीय पात्रता चाच परीक्षेत ते मराठी विषयात नुकतेच उत्तीर्ण झाले आहे.

त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री.सुरेशशेठ काळे, उपाध्यक्ष श्री.तुकाराम काळे, कार्याध्यक्ष श्री.शिवाजीराव घोडेकर,सचिव अॕड.मुकुंदराव काळे, महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन अॕड.संजय आर्विकर,न्यू इंग्लिश मेडियमचे चेअरमन श्री.अजितशेठ काळे, प्राचार्य डॉ.इंद्रजित जाधव, उपप्राचार्य व मराठी विभागप्रमुख प्रोफेसर डॉ.ज्ञानेश्वर वाल्हेकर, डॉ.पुरुषोत्तम काळे, प्रा.पोपटराव माने,सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,सेवक,इ.नी त्यांचे अभिनंदन केले आहे.

श्री.भवारी हे मराठी विभागातील नेट उत्तीर्ण झालेले १८ वे माजी विद्यार्थी आहेत.विभागातील १८ विद्यार्थी आजमितीस एकुण २४ वेळेस सेट व नेट परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत.

Previous articleसीमाभागातील मराठी बांधवांच्या समस्या व प्रश्नांविषयी संविधानिक मार्गाने संसदेत आवाज उठवणार – खासदार डॉ. अमोल कोल्हे
Next articleविजय गायकवाड प्रतिष्ठानच्यावतीने शिवजयंती उत्साहात साजरी