विजय गायकवाड प्रतिष्ठानच्यावतीने शिवजयंती उत्साहात साजरी

गणेश‌ सातव , वाघोली

अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत, लोककल्याणकारी राजा श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विविध मान्यवरांच्या उपस्थितीत खराडी जकात नाका येथे मोठ्या उत्साहात साजरी झाली.

शिवजयंती निमित्त विजयराव गायकवाड युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांस पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले. यामध्ये आदर्श सरपंच वसुंधरा उबाळे, वृक्षमित्र चंद्रकांत वारघडे, सामाजिक क्षेत्र अँड.बस्तू रेगे, कोरोना काळातील आरोग्यसेवेसाठी आय मॅक्स हॉस्पिटल,कोरोना योद्धा डॉ. दिनेश बेहरे, डॉ.अतुल भस्मे,आदर्श पत्रकारिता क्षेत्र सुरेश वांढेकर, निलेश कांकरिया,सामाजिक उपक्रम संतोष भरणे, ज्येष्ठ नागरिक बाळासाहेब सातव सर, जातीय सलोखा राखणे सर्जेराव वाघमारे, उद्योग क्षेत्र सागर ताकवले,क्रीडा क्षेत्र मल्हारी गव्हाणे या सर्व मान्यवरांना उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

यावेळी वडगावशेरीचे आमदार सुनील टिंगरे,जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके,माजी आमदार बापूसाहेब पठारे,नगरसेवक महेंद्र पठारे,भैय्यासाहेब जाधव,सुरेंद्र पठारे, रामदास दाभाडे,महेंद्र भाडळे,सुनील जाधवराव,अनिल सातव,रामकृष्ण सातव, शैलेश बनसोडे,नारायण गलांडे,राहुल गव्हाणे, रामदास दरेकर,राहुल भंडारे,सुरेश भोर,गणेश भोर, राजू चव्हाण, विजय गायकवाड युवा प्रतिष्ठान व 56 बॉईज खराडी,पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Previous articleचंद्रकांत भवारी नेट परीक्षा उत्तीर्ण
Next articleमराठी पत्रकार परिषदेच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन एस एम देशमुख यांच्या हस्ते