शिवजयंती निमित्त ऊसतोड कामगारांना अन्नदान

घोडेगाव – अन्नदान हेच श्रेष्ठदान आहे, शिवजयंती निमित्त सलग चौथ्या वर्षीही ऊसतोड कामगार,मजुरांना साई जनसेवा संस्था तसेच श्री स्वामी समर्थ परिवांराच्या वतीने, सामाजिक उपक्रम राबवत घोडेगाव परिसरातील कोटमदरा तसेच पानमळा येथील अनेक वस्त्यांना संस्थेचे अध्यक्ष रमेश गायकवाड यांच्या वतीने अन्नदान करण्यात आले आहे.

यावेळी घोडेगाव कोटमदरा येथील श्री स्वामी दत्त आबाल वृध्दाश्रमातील बालकांना चांगले संस्कार व्हावे यासाठी,त्यांना देखिल अन्नदान करण्यासाठी,घेवून जाण्यात आले होते. त्यामुळे भविष्यात ही बालके गोर – गरिब नागरिकांना कुठेतरी मदतीचा हाथ देतील व छत्रपती शिवाजी राज्यांच्या विचारने चालतील असे मत यावेळी रमेश गायकवाड यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी साई जनसेवा संस्थेचे अध्यक्ष रमेश नारायण गायकवाड,सामाजिक कार्यकर्ते अमोल काळे ,प्रफुल गव्हाणे,अविनाश वडतिले, उसतोड मजुर,त्याचा परिवार तसेच आश्रमातील मुले उपस्थित होते.

साई जनसेवा संस्था व श्री स्वामी समर्थ परिवार यांच्या मार्फत नयन मनोहर श्री दत्त मंदिरची स्थापना तसेच श्री स्वामीदत्त आबाल वृद्धाश्रम , गोपाल प्रिय गो- शाळा असे विविध उपक्रम गेले ५ वर्षात राबवले गेले आहे.

कोटमदरा आश्रमातील अनाथ आबालवृद्धांना तसेच श्री स्वामीदत्त आबाल वृद्धाश्रम माध्यमातुन होणारे विविध प्रकारचे उपक्रमांना,आपण देखिल अनेक प्रकारे मदत करु शकता.लोकांनी जर सामाजिक काम करणाऱ्या या संस्थेला सढळ हाताने मदत केली तर अजून मोठया प्रमाणात सामाजिक उपक्रम राबवले जातील असे मत सामाजिक कार्यकर्ते अमोल काळे यांनी व्यक्त केले आहे.

अशा प्रकारे सामाजिक उपक्रम राबवत छत्रपती राज्यांची एक आगळी वेगळी जयंती या ठिकाणी उसतोड मजूंरासोबत साजरी करण्यात आली आहे.

Previous articleपर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी विघ्नहर देवस्थान ट्रस्टच्या कामाचा घेतला आढावा
Next articleदौंड मध्ये शिवकालीन वेशभूषा स्पर्धेत बालमावळ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद