पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी विघ्नहर देवस्थान ट्रस्टच्या कामाचा घेतला आढावा

नारायणगाव ,किरण वाजगे

शनिवारी १९ फेब्रुवारी रोजी किल्ले शिवनेरी येथे शिवजयंती सोहळ्यास उपस्थित राहिल्यानंतर राज्याच्या उद्योग , खनिकर्म , पर्यटन फलोत्पादन , क्रिडा व युवक कल्याण राजशिष्टाचार , माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी सांयकाळी श्री क्षेत्र ओझर येथे विघ्नहराचे दर्शन घेतले व देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेतला. त्यांच्या हस्ते अभिषेक व महापूजा देखील करण्यात आली. श्री क्षेत्र ओझर नगरी मध्ये त्यांचे फटाक्याच्या आताषबाजीत स्वागत करण्यात आले.


ओझर मधील सुवासिनींनी त्यांचे औक्षण केले . मंदिरामध्ये अभिषेक व पूजा केल्या नंतर मंदिर प्रदक्षिणा मार्गावरील मंदिरातील चालू असलेल्या स्टोन पॉलिश व कव्हरिंग कामाची माहिती घेतली . मंदिराच्या दक्षिण बाजूस नव्यानेच विकसित केलेल्या विघ्नहर गार्डन मध्ये असणार्‍या विविध वनस्पती, गजाननाच्या पूजेमध्ये अतिशय आवश्यक व प्रिय असणाऱ्या २१ पत्री व देखाव्याची माहिती विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कवडे यांनी दिली. देवस्थान ट्रस्टच्या आगामी हेलीकॉप्टर सेवा व हॉस्पीटल सेवा आदी विकास कामांची माहिती दिली.

याप्रसंगी आदिती तटकरे यांनी मार्गदर्शन करताना देवस्थान ट्रस्टच्या विकासकामांविषयी समाधान व्यक्त केले. पर्यटनाच्या माध्यमातून मंजूर झालेल्या २३ कोटी रुपये निधी व्यतीरिक्त जादा निधी देऊन विकास प्रकल्पांना हातभार लावण्याचे त्यांनी आश्वासन दिले.

देवस्थान ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष गणेश कवडे यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी देवस्थान ट्रस्टचे खजिनदार कैलास घेगडे, ओझर नंबर १ च्या सरपंच मथुरा कवडे, ओझर नंबर २ च्या सरपंच तारामती कर्डक, विश्वस्त मंगेश मांडे, आनंदराव मांडे , रंगनाथ दादा रवळे, कैलास मांडे , गणपतराव कवडे , राजश्रीताई कवडे , ओझर नं १ नगरीच्या प्रथम आदर्श सरपंच अस्मिता कवडे, उपसरपंच विठ्ठल जाधव , भोसले भाऊसाहेब, दीपक कवडे, गणेश मांडे, व्यवस्थापक गणेश टेंभेकर, पांडुरंग कवडे, पंकज गाडेकर, दुर्गा मांडे , सुरेखा मांडे , प्रिती रोकडे, चंदा पंडित, रूपाली मनसूख व ओझरकर ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous articleछत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आजच्या तरुण पिढीने घ्यावा -प्रतापराव खांडेभराड
Next articleशिवजयंती निमित्त ऊसतोड कामगारांना अन्नदान