दौंड मध्ये शिवकालीन वेशभूषा स्पर्धेत बालमावळ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

दिनेश पवार – दौंड

दौंड येथे विविध उपक्रमांनी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली यानिमित्ताने येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकांमध्ये विश्व पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यात आले होते शिवजयंती निमित्ताने आयोजित परिवर्तन व्याख्यानमालेत दीपक शिकारपूर,मकरंद टिल्लू,डॉ. गिरिष जखोटिया यांची व्याख्याने झाली, शिवकालीन वेशभूषा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यामध्ये पहिल्या गटात सर्वेश किरण शेळके,पियुष आढाव,तन्वी तन्मय पवार,दुसऱ्या गटात-आयुष आढाव,ओम भुमकर,पृथ्वीराज पानसरे
स्वरूप पोळ,तिसऱ्या गटात-पृथ्वीराज जगताप,उर्मिला भोसले,गट चौथा-अनुष्का पानसरे,स्वरा पोळ,गायत्री देशमुख,वेदांत लगड,खुला गट- सतीश पाचपुते यांनी अनुक्रमे यश मिळवले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघ रोटरी क्लब ऑफ दौंड व शिवस्मारक समितीच्या सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले.

Previous articleशिवजयंती निमित्त ऊसतोड कामगारांना अन्नदान
Next articleयंदा सासवडला राज्यस्तरीय तेरावे छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन – दशरथ यादव