पोवाडा,पाळणा आणि बाल मावळ्यांच्या उत्साहाने शिवजयंती साजरी

दिनेश पवार – दौंड

लर्न अँड प्ले प्री,प्रायमरी,सेकंडरी स्कुल दौंड या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील बालमावळ्यांनी पोवाडा,पाळणा,भाषण इत्यादी चे सादरीकरण करून शिवजयंती साजरी केली, इयत्ता पहिली च्या अवनिश गर्जे यानें पोवाडा सादर करून सर्वांचीच मने जिंकली,शिवजयंती म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता,संस्कृती जपण्याचे काम या बालमावळ्यांनी आपल्या सादरीकरणातून केले,या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा.दिनेश पवार व संचालिका सविता भोर यांच्या हस्ते शिवप्रतिमा पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली

यासाठी मुख्याध्यापिका- स्वाती मोटे,सांस्कृतिक विभाग प्रमुख-
गौरी पवार,पर्यवेक्षिका प्राथमिक विभाग-
रेखा वाळके,रूपाली नलगे -सहशिक्षिका
पूजा दाभोळे- सहशिक्षिका व सर्व सहकारी शिक्षक वृंद यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले

Previous articleराष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या पुणे जिल्हा उपाध्यपदी अनिल जगताप यांची निवड
Next articleकान्हेवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत रंगला स्ट्रॉबेरी महोत्सव : सह्याद्री प्रतिष्ठानचा अनोखा उपक्रम