राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या पुणे जिल्हा उपाध्यपदी अनिल जगताप यांची निवड

उरुळी कांचन

अनिल जगताप यांची पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. आमदार अशोक पवार खासदार डॉ अमोल कोल्हे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रदिप गारटकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे कामकाज करत आहे पक्षाने दिलेली जबाबदारी अधिक निष्ठेने पार पाडणार असे जगताप यांनी नियुक्ती झाल्याने सांगितले.

याप्रसंगी पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन घोटकुले, बारामती लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अजिंक्य टेकवडे, हवेली तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष दिलीप वाल्हेकर, हवेली तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सागर कांचन, जगदीश महाडिक आदी पदाधिकारी युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleखासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवजयंती कर्नाटकात केली साजरी
Next articleपोवाडा,पाळणा आणि बाल मावळ्यांच्या उत्साहाने शिवजयंती साजरी