उद्या शिवजयंती निमित्त पी के फाउंडेशन संचलित पी के टेक्निकल कॅम्पसच्या वतीने शिवकालीन युद्ध साहित्य प्रदर्शन

चाकण – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारी रोजी जगभरात साजरी केली जाते. यावेळी शिवप्रेमींकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या अनुषंगाने पी के टेक्निकल कॅम्पस च्या वतीने यावर्षी शिवाकालीन युद्ध साहित्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पी के फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रतापराव खांडेभराड यांनी दिली.

शिवरायांनी ज्या साहित्याद्वारे युद्धे लढली ते साहित्य विद्यार्थ्यांना पाहता यावे व त्यामधून विद्यार्थ्यांच्या वाचनात शिवरायांचा इतिहास यावा यातून प्रेरणा घेऊन त्यांनी शिवचरित्र वाचावे,देशप्रेम जागृत व्हावे, मन,मनगट आणि मेंदू केवळ आणि केवळ मातृभूमीच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी वापरले जावे.यादृष्टीकोनातून या प्रदर्शनाचे आयोजन शंभुराजे मर्दानी खेळ विकास मंच,चिंचवड यांच्या मदतीने करण्यात आलेले आहे. सदर प्रदर्शन हे सर्वांसाठी खुले असून आपणास सकाळी साडे दहा ते संध्याकाळी सहा वेळेमध्ये पाहता येईल.

शिवजयंतीच्या निमित्ताने पी के टेक्निकल कॅम्पस मध्ये उद्या सकाळी साडे नऊ पासून शिवप्रतिमा पूजन, शिव पालखीची मिरवणूक, विविध सांस्कृतिक कार्यक्रम व शिवकालीन युद्ध साहित्य प्रदर्शनाचा कार्यक्रम होईल. सदर शिवजयंतीच्या कार्यक्रमासाठी व प्रदर्शन पाहण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन पी के फाउंडेशन तर्फे करण्यात येत आहे.

Previous articleपाटस ग्रामविकास फाउंडेशनचा शिवजयंती निमित्ताने सन्मान
Next articleहवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी विजय तुपे यांची निवड : आमदार अशोक पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र