हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी विजय तुपे यांची निवड : आमदार अशोक पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र

उरुळी कांचन

हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी विजय तुपे यांची निवड झाली शिरुर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

याप्रसंगी हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष दिलीप वाल्हेकर, प्रवक्ते विकास लवांडे, पंचायत समिती सदस्या हेमलता बडेकर, जिल्हा महिला अध्यक्षा भारती शेवाळे, तालुका महिला अध्यक्षा सुरेखा भोरडे, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य संतोष कांचन, जिल्हा उपाध्यक्ष नंदुपाटिल काळभोर, ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब कांचन, तालुका युवक अध्यक्ष सागर कांचन, संजय गांधी निराधार योजना तालुका अध्यक्ष योगेश शितोळे, ओबीसी अध्यक्ष तालुका सुभाष टिळेकर, शिक्षक सेल जिल्हा सरचिटणीस बाळकृष्ण काकडे, अर्जुन कांचन, सुभाष बगाडे, रामदास तुपे, मा.उपसरपंच सागर कांचन आदी उपस्थित होते.

आमदार अशोक पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटनेचे काम करणार सर्वांना बरोबर घेऊन असे नुतन तालुका उपाध्यक्ष विजय तुपे यांनी सांगितले.

Previous articleउद्या शिवजयंती निमित्त पी के फाउंडेशन संचलित पी के टेक्निकल कॅम्पसच्या वतीने शिवकालीन युद्ध साहित्य प्रदर्शन
Next articleहवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी विजय तुपे यांची निवड : आमदार अशोक पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र