पाटस ग्रामविकास फाउंडेशनचा शिवजयंती निमित्ताने सन्मान

योगेश राऊत , पाटस

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून जनहित फाउंडेशन कुसेगाव आयोजित अटल व्याख्यानमाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल पाटस (ता.दौंड,जि. पुणे ) येथील पाटस ग्रामविकास फाउंडेशन या सामाजिक संस्थेचा भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मा.श्री वासुदेवनाना काळे व शिव व्याखाते श्री कोकाटे यांच्या हस्ते ‘सन्मानचिन्ह’ देऊन गौरविण्यात आले.

पाटस व परिसरात अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्यात पाटस ग्रामविकास फाउंडेशन चा मोलाचा वाटा आहे यामध्ये ग्रामतालाव खोलीकरण,ओढा खोलीकरण,पाटस स्टेशन रस्ता मुरुमीकरण, नागेश्वर विद्यालय एक वर्गखोली बांधकाम, जिल्हा परिषदेच्या शाळेत खेळ मैदान,सांस्कृतिक कार्यक्रम स्टेज, संरक्षक भिंत दुरुस्ती, ग्रामसुरक्षा अभियाना अंतर्गत सुमारे चाळीस हॅलोजन बसविणे,कोरोना काळात गरजूंना किराणाचे आधार किट वाटप,गरजू विद्यार्थ्यांना नवीन ड्रेस,पुस्तके तसेच १२ महिने विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप,पाटस बस स्टँड विषयी उपोषण व पाठपुरावा, हडपसर-पाटस पीएमपीएमएल बस सुरू व्हावी यासाठी अथक पाठपुरावा अशी अनेक लोकोपयोगी अभियाने राबवून ती याच पाटस ग्रामविकास फाउंडेशनच्या माध्यमातून यशस्वी देखील झाली.

यावेळी आध्यात्मिक गुरू श्री तात्या महाराज ढमाले ,माजी पंचायत समिती उपसभापती साहेबराव वाबळे,भीमा पाटस कारखान्याचे विद्यमान संचालक बाळासाहेब तोंडे पाटील,जेष्ठ नेते डॉ मधूकर आव्हाड व शिवसंग्राम पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव साळुंखे पाटस ग्रामविकास फाउंडेशन चे विनोद कुरुमकर,हर्षद बंदीष्टी,गणेश जाधव,जुनेद तांबोळी, गणेश शितोळे, राजू गोसावी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुसेगाव ता.दौंड चे मा सरपंच तसेच जनहित फाउंडेशन चे अध्यक्ष श्री मनोज फडतरे यांनी केले.

Previous articleमावळ तालुका ब्लाँक काँग्रेस कमिटीच्या तालुकध्यक्षपदी यशवंतराव मोहोळ यांची निवड
Next articleउद्या शिवजयंती निमित्त पी के फाउंडेशन संचलित पी के टेक्निकल कॅम्पसच्या वतीने शिवकालीन युद्ध साहित्य प्रदर्शन