नारायणगाव क्रिकेट लीग स्पर्धेत महाकालेश्वर छत्रपती वॉरियर्स विजयी

नारायणगाव : किरण बाजगे

जुन्नर तालुक्यात प्रतिष्ठेची क्रिकेट स्पर्धा म्हणून समजली जाणारी नारायणगाव क्रिकेट लीग म्हणजेच एनसीएल या स्पर्धेत महाकालेश्वर छत्रपती वॉरियर्स या टीमने प्रथम क्रमांक मिळवला.
उपविजेतेपद स्वर्गीय नितीनभाऊ बाळसराफ प्रतिष्ठान या संघाला मिळाले.

गेली पाच दिवस सुरू असलेल्या या स्पर्धेत तृतीय क्रमांक श्री स्वामी समर्थ चॅम्पियन्स या संघाला तर चतुर्थ क्रमांक शिवस्वराज्य चॅलेंजर्स या संघाने मिळविला. गेली दोन वर्ष ही स्पर्धा कोरोना संसर्गामुळे झाली नाही. मात्र यावर्षी वारूळवाडी येथे स्पर्धा भरून देखील या स्पर्धेला प्रेक्षकांचा व क्रीडा रसिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.
अंतिम सामन्यासाठी देखील मोठा जनसमुदाय जमला होता.


यावेळी स्पर्धेचे बक्षीस समारंभ जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके, राष्ट्रवादीचे युवा नेते अमित बेनके, विघ्नहर साखर कारखान्याचे संचालक संतोष नाना खैरे, उपसरपंच अरिफ आतार, ग्रामविकास अधिकारी नितीन नाईकरे, मुक्ताई देवस्थान चे सचिव विकास तोडकरी, कृष्णा सोनवणे, गुलाबराव नेहरकर, सुजित खैरे, गणेश वाजगे, किरण वाजगे आदी मान्यवरांच्या उपस्थित झाले.

स्पर्धेचे यशस्वी आयोजन एन सी एल चे कोर कमिटी सदस्य अभिजीत नारूडकर, अजित वाजगे, बाळा इचके, संतोष मिस्त्री कोल्हे, मुकेश वाजगे, तुषार कोराळे, मंदार पाटे, जालू खैरे, मच्छिंद्र जगताप, पवन खैरे,अनिल धांडे, अमोल घोडेकर, राजू पाटे, विनोद शेटे, किरण गुंजाळ, डॅनी गुंजाळ, राजू कोराळे, विकास गाडेकर, किरण ताजणे, वैभव नारूडकर, विजय कोल्हे आदींनी केले.

Previous articleआरोग्यदायी जीवनासाठी योगा करणे महत्वाचे-डॉ.सुनीता कटारिया
Next articleयावर्षी परिवर्तन व्याख्यानमाला ऑनलाइन