यावर्षी परिवर्तन व्याख्यानमाला ऑनलाइन

दिनेश पवार : दौंड

शिवजयंती उत्सव निमित्ताने रोटरी क्लब दौंड,अखिल भारतीय मराठा महासंघ संचलित शिवकृपा सार्वजनिक वाचनालय दौंड आयोजित परिवर्तन व्याख्यानमाला यावर्षी ऑनलाइन होणार आहे,सदर व्याख्यानमाला दि.16 फेब्रुवारी 2022 ते 18 फेब्रुवारी 2022 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.

16 फेब्रुवारी ला रो.डॉ.दिपक शिकारपूर यांचे आगामी काळातील आव्हानात्मक डिजिटल करियर, दि.17 फेब्रुवारी रोजी रो.मकरंद टिल्लू यांचे हसण्यासाठी जगा, जगण्यासाठी हसा,दि.18 फेब्रुवारी रोजी डॉ. गिरीश जाखोटीया यांचे छत्रपती शिवाजी महाराज आणि 21 वे शतक या विषयावर व्याख्यान होणार आहे, सदर व्याख्यानमाला झूम वरती आयडी 85768593454 असून पासवर्ड 1234 असा आहे, यासाठी विशेष तांत्रिक साहाय्य क्रिएटिव्ह कम्प्युटर दौंड चे आहे,तरी सर्वांनी या व्याख्यानमालेत सहभागी व्हावे असे रोटरी क्लब च्या अध्यक्ष रो.शालिनी पवार,अ.भा. मराठा महासंघ चे अध्यक्ष दादासो नांदखिले,शिवकृपा वाचनालय चे अध्यक्ष प्रसाद गायकवाड,संयोजक हरिश्चंद्र ठोंबरे यांनी आवाहन केले आहे

Previous articleनारायणगाव क्रिकेट लीग स्पर्धेत महाकालेश्वर छत्रपती वॉरियर्स विजयी
Next articleलॉकडाऊन नंतर पर्यटकांच्या सेवेसाठी एमटीडीसी ने कंबर कसली, कर्मचाऱ्यांना आदरातिथ्य आणि खानपान बाबतचं अत्याधुनिक प्रशिक्षण