आरोग्यदायी जीवनासाठी योगा करणे महत्वाचे-डॉ.सुनीता कटारिया

दिनेश पवार : दौंड

आरोग्यदायी जीवनशैली जगण्यासाठी सर्वांनी योगा,मेडिटेशन करणे गरजेचे आहे असे मत फिट अँड हेल्थ क्लब दौंड च्या डॉ.सुनीता कटारिया यांनी क्रिएटिव्ह कम्प्युटर दौंड,रोटरी क्लब ऑफ दौंड,फिट अँड हेल्थ क्लब दौंड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित योग शिबिरात व्यक्त केले,राज्य राखीव बल गट क्रमांक 7 येथील अष्टविनायक सभागृह येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना व्यायामाचे,योगाचे, मेडिटेशन चे काही प्रात्यक्षिक दाखवण्यात आले तसेच मान्यवर व प्रमुख मार्गदर्शकानी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले,

यावेळी क्रिएटिव्ह कम्प्युटर चे उल्हास मिसाळ,अर्चना मिसाळ,सविता भोर,डॉ.सुनीता कटारिया, वरिष्ठ शिक्षक नितिन साळवे, इतर मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते

Previous articleवाघोलीत शांताराम बापु कटके व शनीभाऊ शिंगारे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य नोकरी महोत्सव संपन्न
Next articleनारायणगाव क्रिकेट लीग स्पर्धेत महाकालेश्वर छत्रपती वॉरियर्स विजयी