खेड तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी महेंद्र शिंदे व कार्याध्यक्षपदी निवृत्ती नाईकरे

राजगुरुनगर : खेड तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दैनिक सकाळचे महेंद्र शिंदे यांची तर कार्याध्यक्षपदी निवृत्ती नाईकरे यांची निवड करण्यात आली.

खेड तालुका पत्रकार संघाची वार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. यात अध्यक्ष पदी दैनिक सकाळचे कडूस येथील प्रतिनिधी महेंद्र शिंदे यांची अध्यक्षपदी निवड झाली. खेड तालुका पत्रकार संघाच्या वार्षिक बैठकीत नवनिर्वाचित अध्यक्ष महेंद्र शिंदे यांना सर्वानुमते कार्यकारिणी निवडीचे अधिकार देण्यात आले होते, त्यानुसार पत्रकार संघाच्या बैठकीत कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अध्यक्ष – महेंद्र शिंदे, कार्याध्यक्ष – निवृत्ती नाईकरे, उपाध्यक्ष – चंद्रकांत मांडेकर, एम.डी. पाखरे, आदेश भोजने, सचिव – किरण खुडे, सहसचिव – इसाक मुलाणी, खजिनदार – तुषार मोढवे, सहखजिनदार – सुभाष लोहोट, पत्रकार परिषद समन्वयक – रामचंद्र सोनवणे, प्रसिध्दी प्रमुख – सदाशिव आमराळे, कायदेशीर सल्लागार – अॅङ निलेश आंधळे, सल्लागार – राजेंद्र सांडभोर, कोंडीभाऊ पाचारणे, चाकण विभाग प्रतिनिधी – भानुदास पऱ्हाड, कार्यकारीणी सदस्य – रोहिदास गाडगे, आदेश टोपे, कुंडलीक वाळुंज.

भावी काळात पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, पत्रकारांसाठी कार्यशाळा, आरोग्य शिबिरे आदी उपक्रम राबविणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष शिंदे यांनी सांगितले.

Previous articleसंजीवन समाधी म्हणजे चित्त व प्राण पंचमहाभूतात विलीन करुण चीरकाळ चैतन्य निर्माण करणे- जेष्ठ समाजसेवक,प्रवचनकार डॉ रविंद्र भोळे
Next articleकिल्ले शिवनेरी ते शिवतीर्थ किल्ले रायगड “शिवरथ” यात्रेला प्रारंभ