किल्ले शिवनेरी ते शिवतीर्थ किल्ले रायगड “शिवरथ” यात्रेला प्रारंभ

नारायणगाव: किरण वाजगे

गेली बारा वर्षांपासून “किल्ले शिवनेरी ते शिवतीर्थ किल्ले रायगड” अशी शिवतीर्थ यात्रा दरवर्षी निघत असते. शिवजयंती उत्सवाच्या काही दिवस आधी सह्याद्री प्रतिष्ठान, हिंदुस्थान च्या वतीने ही शिवरथ यात्रा काढण्यात येते.

याच अनुषंगाने याहीवर्षी या शिवरथ यात्रेचे किल्ले शिवनेरी गडावरून प्रस्थान झाले.या शिवरथ यात्रेचा आज गुरुवार दिनांक ३ फेब्रुवारी रोजी किल्ले शिवनेरी गडावरून प्रारंभ करण्यात आला. येत्या ७ फेब्रुवारी रोजी किल्ले रायगडावर ही शिवतीर्थ यात्रा पोहोचणार आहे. अशी माहिती सह्याद्री प्रतिष्ठानच्या संयोजकांच्या वतीने देण्यात आली.


आज सकाळी जुन्नर येथील किल्ले शिवनेरी गडावरील शिवजन्मस्थळावर अभिषेक करण्यात आला. त्यानंतर राजमाता जिजामाता व बाल शिवाजी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून शिवाई मातेची पूजा अभिषेक व आरती करण्यात आली. याप्रसंगी पारंपरिक वाद्य, तुतारी व शिवजयघोषात या शिवतीर्थ यात्रेचे किल्ले रायगडाकडे प्रस्थान झाले.

याप्रसंगी बहुसंख्येने शिवप्रेमी, शिवभक्त, अबालवृद्ध व महिला भगिनी देखील या शिवतीर्थ यात्रेत सहभागी झाल्या होत्या.

Previous articleखेड तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी महेंद्र शिंदे व कार्याध्यक्षपदी निवृत्ती नाईकरे
Next articleनिधन वार्ता – हिंगणगाव – काळभैरवनाथ सोसायटीचे व्हा.चेअरमन दत्तात्रय कोतवाल यांचे निधन