संजीवन समाधी म्हणजे चित्त व प्राण पंचमहाभूतात विलीन करुण चीरकाळ चैतन्य निर्माण करणे- जेष्ठ समाजसेवक,प्रवचनकार डॉ रविंद्र भोळे

उरुळी कांचन

समाधी हि पतान्जल योगाची संकल्पना असुन अष्टांग योगातिल यम, नियम, आसन, प्रत्यहार, प्राणायाम, धारणा, ध्यान, व त्यातील समाधी हि शेवटची योगाची पायरी आहे. तंत्रसमाधी, तटस्थ समाधी, पवित्र समाधी, चिरंजीव समाधी, जलसमाधी, संजीवन समाधी असे शास्रात समाधीचे वर्णन असुन चित्तवृती निरोध रोखून चित्त व प्राण पंचमहाभुतात विलीन करणे व सदैव्य, चिरकाळ चैतन्य निर्माण करणे म्हणजे संजीवन समाधी होय. सद्गुरु दौलत बाबा ह्यानी संजीवन समाधी घेऊन परिसर पवित्र केला असे मत जेष्ठ प्रवचन्कार, समाजसेवक डॉ रविंद्र भोले ह्यानी येथे व्यक्त केले. श्री नाथ सांप्रदाय सद्गुरु दौलत बाबा मठ ट्रस्ट शिंदेवाडी येथे दौलत बाबा ह्यांचा चौसस्ठ व्या संजीवन समाधी कार्यक्रमात प्रवचन करताना समाधी सोहळ्या निमित्त वरिल मत प्रतिपादन केले.

तसेच संत दौलत बाबा परिसर तिर्थ क्षेत्र व्हावे, व परिसराचा सर्वांगीण विकास व्हावा,रोगी लोकानी योगी व्हावे व तरुणांनी व्यसनमुक्त रहावे, ह्या महान योगी सद्गुरु यादव बाबा ह्यांचा आदर्श घ्तवा असेही हभप डॉ रविंद्र महाराज भोळे ह्यानी आपल्या प्रबोधन् पर प्रवचनात व्यक्त केले. ह्या वेळी दौलत बाबा मठ ट्रस्ट चे सर्व कार्यकर्ते परिसरातील भाविक भक्त , गावकरी , भजनी मंडळ, विध्यार्थी वारकरी बहूसंखेने उपस्थीत होते.

दरवर्षी संजीवन सोहळ्या निमित्तने महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नामवंत समाजसेवक डॉ रविंद्र भोले उरुळी कांचन ह्यांचे प्रवचनाचे आयोजन अनेक वर्षापासून करण्यात येत आहे.

Previous articleमराठी नाट्य-चित्रपटसृष्टीचा एक गौरवशाली अध्याय संपला-अजित पवार
Next articleखेड तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी महेंद्र शिंदे व कार्याध्यक्षपदी निवृत्ती नाईकरे