उरुळी कांचन येथील प्रयोगशिल कृषी निष्ठ शेतकरी भाऊसाहेब कांचन यांच्या गच्ची वरील फुलवलेल्या द्राक्षबागेची कृषि आयुक्त धिरजकुमार यांनी केली पाहणी

उरुळी कांचन

प्रयोगशिल शेतकरी भाऊसाहेब पांडुरंग कांचन पाटील मळा उरुळी कांचन यांनी आपल्या घराच्या टेरेसवर फुलवलेल्या द्राक्ष बागेची पाहणी महाराष्ट्र राज्याचे कृषि आयुक्त धिरजकुमार, राज्याचे निविष्ठा व गुणनियंत्रण संचालक दिलीप झेंडे, पुणे जिल्याचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी ज्ञानेश्वर बोटे यांनी नुकतीच पाहणी करुन समाधान व्यक्त केले. हि एक भन्नाट कल्पना प्रत्यक्षात शहरी भागासाठी एक वरदान आहे यातून एक वेगळी प्रेरणा मिळाली असल्याचे आयुक्त धिरजकुमार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. हा एक अनोखा व आगळावेगळा प्रयोग असून इतरांना प्रेरणादायी असण्याचे मत निविष्ठा व गुनानियंत्रण महाराष्ट्र राज्य संचालक दिलीप झेंडे यांनी व्यक्त केले. तर याबाबत अनेक शेतकऱ्यांनी माहिती घेतल्याचे ज्ञानेश्वर बोटे यांनी आवर्जून सांगितले.

यावेळी निवृत्त जिल्हा मृद सर्व्हेक्षण व मृद चाचणी अधिकारी सुरेश सातव, डॉ उल्हास सुर्वे, ज्ञानेश्वर नारायण देशमुख, हवेली तालुक्याचे तालुका कृषि अधिकारी मारुती साळे, मंडळ कृषि अधिकारी हडपसर गुलाब कडलग, कृषि अनुरेखक पुरुषोत्तम काकडे व कृषि सहाय्यक राजेंद्र भोसेकर उपस्थित होते. यावेळी माजी सरपंच सुभाष सदाशिव साठे यांचे एस एस अग्रो प्रकल्पास आयुक्त यांनी भेट देवून मधुमका वरील प्रक्रिया व निर्यात याबाबत माहिती घेऊन समाधान व्यक्त केले तसेच कृषि विभागाचे सर्वोतोपरी मदत करण्याचे आवाहन केले.

या वेळी उरुळी कांचन येथील महेश लोंढे न्यू मिलेटस बाबतची आयुक्त यांनी माहिती घेऊन कृषि विभागामार्फत कोणत्या योजनेत अर्थसहाय्य देता येईल या बाबत संचालक दिलीप झेंडे व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी ज्ञानेश्वर बोटे यांचेशी चर्चा केली व निश्चित अतिशय चांगला उपक्रम असल्याचे सांगितले व वेगवेगळ्या प्रदर्शनाच्या माध्यमातून एक्स्पोझर देण्याचे मान्य केले. यावेळी सेंद्रिय गुळ उत्पादक शेतकरी संतोष गोते यांनी आपल्या कोल्डप्रेस भुईमुग तेल व सेंद्रिय गुळाबाबत माहिती दिली.

Previous articleपुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा कारभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पारदर्शक- विकास दांगट-पाटील
Next articleजेनेरिकर्ट एनएव्ही माध्यमातून ग्राहकांना गेली पाच वर्षे चांगली सेवा देण्याचा प्रयत्न- सुनिल जगताप