जेनेरिकर्ट एनएव्ही माध्यमातून ग्राहकांना गेली पाच वर्षे चांगली सेवा देण्याचा प्रयत्न- सुनिल जगताप

उरुळी कांचन

जेनेरिकर्ट कंपनीचे औषधे ज्यातील औषधाचे प्रमाण, त्याची गुणवत्ता, इतर औषधासारखीच असते पण त्याला कोणतेही ब्रॅंड नाव नसते. त्याचा रंग, आकार आणि पॅकिंग वेगळे असते. ही औषधे सर्व जण घेऊ शकतील अशी चांगली सेवा जेनेरिकर्ट एनएव्ही माध्यमातून गेली पाच वर्षे आपल्या शहरात कार्यरत आहे. यापुढे अधिक चांगली सेवा ग्राहकांना मिळो अशा सदिच्छा पाचव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने पुणे जिल्हा पत्रकार संघाचे समन्वयक सुनिल जगताप यांनी दिल्या.

याप्रसंगी उद्योजक वामनराव कांचन, स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानचे विश्वस्त अशोक कांचन, बंडोपंत कांचन, संभाजी कांचन, पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष जितेंद्र बडेकर तसेच जेनेरिकर्ट एनएव्ही प्रमुख सौ अक्षदा अक्षय कांचन, हवेली तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष जयदीप जाधव आदी उपस्थितीत होते.

जेनेरिकर्ट एनएव्ही प्रमुख सौ अक्षदा अक्षय कांचन उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.

Previous articleउरुळी कांचन येथील प्रयोगशिल कृषी निष्ठ शेतकरी भाऊसाहेब कांचन यांच्या गच्ची वरील फुलवलेल्या द्राक्षबागेची कृषि आयुक्त धिरजकुमार यांनी केली पाहणी
Next articleउरुळी कांचन मधील अवैध सावकाराचा फास आवळला