पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा कारभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पारदर्शक- विकास दांगट-पाटील

उरुळी कांचन

शेतकऱ्यांच्या निगडीत प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे. शेतकरी हा मुख्य घटक असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली बँकेचा पारदर्शक कारभार चालू असल्याचे मत नवनिर्वाचित पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विकास दांगट पाटील यांनी आयोजित सत्कार समारंभाला उत्तर देताना व्यक्त केले. शिंदेवाडी (ता.हवेली) येथे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे नवनिर्वाचित सदस्य विकास दांगट पाटील यांचा सत्कार शिंदेवाडी ग्रामपंचायत व आर्ट ऑफ लिविंग तर्फे सत्कार करण्यात आला.

यावेळी हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जगताप, माजी सभापती रोहिदास उंद्रे पाटील, शिवसेना हवेली तालुका प्रमुख प्रशांत काळभोर, माजी सरपंच मिलिंद हरगुडे, युवा नेते सागर काळभोर, वडगाव शेरी राष्ट्रवादी मतदार संघाचे अध्यक्ष राजेंद्र खांदवे पाटील, सरपंच संदीप जगताप, कानिफनाथ विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन रमेश देवकर, प्रताप विविध कार्यकारी अधिकारी सोसायटीचे चेअरमन हरिभाऊ शिंदे, सागर जगताप, उद्धवराव जगताप, ग्रामपंचायत सदस्य संतोष शिंदे, जालिंदर यादव, माजी सरपंच बबनराव तांबे, उपसरपंच मोहनराव शिंदे, कैलासराव शिंदे, नवनाथ जगताप, नितीन शिंदे, रामभाऊ जगताप, पांडुरंग जगताप, बापू कोतवाल, दत्तात्रय बाबुराव जगताप, अशोक जगताप, बाळासाहेब तांबे, दीपक शिंदे व आर्ट ऑफ लिव्हिंग चे साधक योगेश जगताप, प्रभाकर जगताप, जयमाला जगताप अन्य ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

Previous articleहोम स्टे (निवास) व न्याहारी आणि महा भ्रमण योजना संदर्भातील एक दिवसीय पर्यटन कार्यशाळा संपन्न
Next articleउरुळी कांचन येथील प्रयोगशिल कृषी निष्ठ शेतकरी भाऊसाहेब कांचन यांच्या गच्ची वरील फुलवलेल्या द्राक्षबागेची कृषि आयुक्त धिरजकुमार यांनी केली पाहणी