प्रजासत्ताक दिन स्फूर्तीचे जीवंत प्रतिक असून अखंड तेवणारा नंदादीप आहे- समाजसेवक डॉ रवींद्र भोळे

उरुळी कांचन

राष्ट्रभक्तानी आपले बलिदान देऊन व स्वातंत्र्य मिळण्यासाठी सर्वस्वाचा त्याग केला. त्यासाठी अनेक क्रांतीवीर देशभक्ताना बलिदान द्यावे लागले. त्यांच्या त्यागाची व राष्ट्रभक्तीची जाणिव स्वातंत्र्य दिनी होत असते. प्रजासत्ताक दिन म्हणजे त्यागाचे, बलिदानाचे जीवंत प्रतिक असुन अखंड तेवणरा नंदादीप आहे. देशभक्तांसाठी हा राष्ट्रीय सण आहे असे मत जेष्ठ समाजसेवक, प्रवचनकार डॉ रविंद्र भोळे यांनी  व्यक्त केले.

प्रजासत्ताक दिनानिमित्तने महाविर निवासी मुकबधिर विद्यालय याठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी संस्थेचे अध्यक्ष शशिकांत धुरदेव यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष बी एन भालेराव, संस्थेचे सल्लागार सदस्य डॉ रविंद्र भोळे, मुख्याध्यपिका स्मिता सपार, शिक्षक वर्ग ,पालक विध्यार्थी उपस्थित होते.

Previous articleमुंबई माता बाल संगोपन केंद्राच्या वतीने आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप
Next articleदुर्गम भागातील 40 गरजू शालेय विद्यार्थ्यांना मुबंई माता बाल संगोपन संस्थेतर्फे मोफत सायकल वाटप