मुंबई माता बाल संगोपन केंद्राच्या वतीने आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप

राजगुरूनगर- ७३ वा प्रजासत्ताक दिनानिमीत्त मुंबई माता बाल संगोपन केंद्र राजगुरूनगर यांचे वतीने खेड तालुक्यातील ४० आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप करण्यात आले .

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरची ठाकरवाडी जऊळके बु ॥ मुख्याध्यापक श्री वल्लभ क्षिरसागर व उपशिक्षक श्री रामचंद्र येवले यांचे प्रयत्नाने वरची ठाकरवाडी जऊळके बु ॥ येथील श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर विदयालय वाफगाव शाळेत शिक्षण घेत असलेल्या ८ वी च्या गरजू ६ विद्यार्थींनींना मोफत सायकल प्रदान करण्यात आल्या त्यामुळे या मुलींच्या शाळेत जाण्याची सोय झाली .

या कार्यक्रमासाठी मुंबई माता बाल संगोपन केंद्र राजगुरूनगर संस्थेचे सचिव मा. श्री . माधवजी साठे साहेब, स्वाती शिंदे मॅडम, शर्मिला मॅडम, मांजरे मामा यांचे अनमोल योगदान लाभले.

Previous articleफोर्ट ऍडव्हेंचर ग्रुपची हरिश्चंद्र गडावरील शेंडी सुळक्यावरून राष्ट्र ध्वजाला मानवंदना
Next articleप्रजासत्ताक दिन स्फूर्तीचे जीवंत प्रतिक असून अखंड तेवणारा नंदादीप आहे- समाजसेवक डॉ रवींद्र भोळे