दुर्गम भागातील 40 गरजू शालेय विद्यार्थ्यांना मुबंई माता बाल संगोपन संस्थेतर्फे मोफत सायकल वाटप

राजगुरूनगर- आर्थिक परिस्थिती आणि उपलब्ध सोयी सुविधा साधनांच्या अभावी शिक्षण होऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना आधार देण्याच्या भूमिकेतून मुबंई माता बाल संगोपन संस्थेने अदिवासी मुलांना सायकल वाटप करण्याचा उपक्रम संस्थेने हाती घेतला. या सायकलीचे वाटप स्वातंत्र्याचा अमृतमहोस्तव या शुभमुहूर्तावर खेड तालुक्यातील आर्थिक दुर्बल व मागास विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप करण्यात आले.

या आदिवासी मुलांना माद्यमिक शिक्षणाची सोय त्यांच्या गावात नसल्याने दूरवर असलेल्या माद्यमिक शाळेत जावे लागत आहे. या शाळा मुलांच्या घरांपासून तीन ते दहा किलोमीटर लांब प्रवास आहेत. अशा कठीण परिसथिती या आदिवासी मुलांना पायी प्रवास करावा लागत असे. आता या मुलांना सायकल मिळाल्याने त्याच्या वेळेची बचत होईल व विद्यार्थ्यांना वाचलेला वेळ हे विद्यार्थी अभ्यासाला देऊ शकतील. शाळेत जाण्यास परिश्रम कमी झाल्याने या आदिवासी मुलाचे शाळा सोडण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. या मुलाची गरज ओळखुन संस्थेने हा उपक्रम गेली सात वर्षपासून चालू ठेवला आहे.

डॉ.माधव साठे सचिव मुबंई माता बाल संगोपन संस्था,सुहास साठे ,विवेक कोलटकर,मीना कोलटकर,भरती देशपांडे या प्रमुख पाहुण्याच्या हस्ते गरजू आदिवासी मुलांना मोफत सायकल वाटप करण्यात आली.

याप्रसंगी सुहास साठे यांनी 1 लाख रुपयांचा निधी संस्थेला दिला. या कार्यक्रमाचे नियोजन शर्मिला सांडभोर, स्वाती शिंदे,प्रशांत तोत्रे यांनी केले तर मनीषा सुर्वे मॅडम यांनी केले तर आभार सुरेश नाईकरे सरांनी मानले.

Previous articleप्रजासत्ताक दिन स्फूर्तीचे जीवंत प्रतिक असून अखंड तेवणारा नंदादीप आहे- समाजसेवक डॉ रवींद्र भोळे
Next articleघोडेगाव मध्ये ७३ वा प्रजासत्ताक दिन मोठया उत्साहात साजरा